एअर इंडियाचे विमान अचानक रशियात उतरवले
#मगदान
दिल्लीहून अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोकडे जाणारे एअर इंडियाचे विमान 'एआय १७३ च्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचा प्रकार मंगळवारी (६ जून) घडला. यानंतर वैमानिकाने ताबडतोब रशियाच्या मगदान विमानतळाशी संपर्क साधत विमान तिकडे वळवण्याची परवानगी मागितली. यानंतर विमान सुरक्षितरित्या रशियात उतरवण्यात आले. याबाबत अमेरिकेने आम्ही सर्व घडामोडींवर बारकाइने लक्ष ठेवून असल्याचे म्हटले आहे.
खासगी विमान कंपनी एअर इंडियाने मंगळवारी संध्याकाळी सांगितले की, दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोसाठी उड्डाण केलेलया विमानावाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ते रशियातील मगदानकडे वळवण्यात आले. या विमानात २१६ प्रवासी आणि १६ क्रू मेम्बर होते आणि विमान सुरक्षितरित्या उतरवण्यात आले आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
अमेरिकेला जाणारे विमान अचानकपणे रशियात उतरवण्यात आल्यामुळे शंकाकुशंका व्यक्त करण्यात येत आहेत. या विमानात किती अमेरिकन नागरिक होते, याबाबत निश्चित माहिती समोर आलेली नाही, मात्र आम्ही प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेच्या नागरी उड्डाण विभागाचे प्रवक्ते वेदांत पटेल यांनी व्यक्त केली आहे. विमान अमेरिकेत येण्यासाठी निघाले होते. त्यामुळे त्यात अमेरिकेचे नागरिक असण्याची शक्यता नक्कीच आहे. याबाबत एअर इंडियाशी सातत्याने चर्चा सुरू असल्याचेही पटेल यांनी नमूद केले आहे.
प्रवासी पर्यायी विमानाने अमेरिकेत रवाना
दरम्यान प्रवाशांसाठी रशियातून एक पर्यायी विमान उपलब्ध करून दिले आहे. मगदान ते सॅन फ्रान्सिस्कोला पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली असून या विमानातून एआय १७३चे सर्व प्रवासी आणि क्रू मेम्बर रवाना झाले आहेत.
वृत्तसंस्था