'AI' panacea for disease : आजाराच्या थापांवर 'एआय'चा रामबाण इलाज

अलीकडील काही दिवसांपासून 'एआय' म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय जोरदार चर्चेत आला आहे. एआयशी संबंधित अनेक प्रकारच्या उत्पादनांवर आणि सेवांवर सध्या काम सुरू आहे. बऱ्याचदा ऑफिसमध्ये लोक खोटे बोलून रजा घेत असतात. समोरच्या व्यक्तीलाही या रजेला नकार देता येत नाही, कारण संबंधिताने दिलेले कारण आजाराचे असते, पण यापुढे हे चालणार नाही. कारण अशा एआय टूलवर काम केले जात आहे, जे तुमच्या आवाजाच्या मदतीने तुम्हाला सर्दी झाली आहे की नाही ते अचूक सांगू शकणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 12 Apr 2023
  • 02:40 am
आजाराच्या थापांवर 'एआय'चा रामबाण इलाज

आजाराच्या थापांवर 'एआय'चा रामबाण इलाज

आवाजाच्या मदतीने आजारी असल्याचे निदान; सर्दी-तापाच्या बहाण्याने सुट्टी घेणारे गोत्यात

#वेलिंग्टन

अलीकडील काही दिवसांपासून 'एआय' म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय जोरदार चर्चेत आला आहे. एआयशी संबंधित अनेक प्रकारच्या उत्पादनांवर आणि सेवांवर सध्या काम सुरू आहे. बऱ्याचदा ऑफिसमध्ये लोक खोटे बोलून रजा घेत असतात. समोरच्या व्यक्तीलाही या रजेला नकार देता येत नाही, कारण संबंधिताने दिलेले कारण आजाराचे असते, पण यापुढे हे चालणार नाही. कारण अशा एआय टूलवर काम केले जात आहे, जे तुमच्या आवाजाच्या मदतीने तुम्हाला सर्दी झाली आहे की नाही ते अचूक सांगू शकणार आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित उत्पादने मानवी बुद्धिमत्तेच्या अडचणीत वाढ करणार, हे स्पष्ट होत असल्याची भावना वाढीस लागते आहे. आता वेगवेगळ्या कंपन्यांनी आपापल्या उत्पादनांमध्ये आणि सेवांमध्ये 'चॅट जीपीटी'सारखे चॅटबॉट्स देण्यास सुरुवात केली आहे. हे चॅटबॉट काय-काय करू शकतात याची तुम्ही कल्पना देखील करू शकणार नाही. याबाबत दररोज नवीन काहीतरी संशोधन समोर येत आहे. आता तुमच्या आवाजावरून तुम्हाला खरेच सर्दी झाली की नाही हे सुध्दा एआयच्या मदतीने समजणार आहे.

सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सुरत येथील काही संशोधकांनी यासाठी ६५० लोकांच्या आवाजाच्या नमुन्यांचा अभ्यास केला, त्यापैकी १११ लोकांना सर्दी झाल्याचे आढळून आले. सर्दी झाली की नाही हे माहिती करण्यासाठी या लोकांच्या व्होकल पॅटर्नचे विश्लेषण करण्यात आले. अभ्यासात हार्मोनिक्स म्हणजेच व्होकल रिदमचा वापर करण्यात आला. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आवाजाची तीव्रता वाढते तेव्हा हार्मोनिक्सकडून ॲम्प्लिट्यूड कमी केला जातो आणि सर्दी-खोकल्याने त्रस्त असलेल्या व्यक्तीचा व्होकल पॅटर्न अनियमित राहतो. या प्रक्रियेनुसार संशोधकांनी मशीन लर्निंग अल्गोरिदमच्या मदतीने लोकांमध्ये असलेल्या सर्दी-पडसे या आजारांबाबत चाचणी घेतली.

या चाचणी दरम्यान, लोकांना एक ते ४० पर्यंतचे अंक मोजण्यास आणि नंतर त्यांचे विकेंडचे वर्णन करण्यास सांगितले गेले. याशिवाय लोकांना 'द नॉर्थ विंड अँड द सन' ही कथा वाचण्यास सांगण्यात आले होते. अभ्यासात सुमारे ७० टक्के अचूकता दिसून आली. या अभ्यासाचा एकमेव उद्देश डॉक्टरांकडे न जाता लोकांना सर्दी झाली आहे की नाही याचा शोध घेणे हा होता. हा अभ्यास उद्योजकांच्या चांगलाच पसंतीस पडू शकतो कारण या तंत्राचा वापर कर्मचार्‍यांसाठी केला 

जाऊ शकतो जे निरनिराळ्या आजाराचे बहाणे करून सुट्टी घेतात. वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest