चित्रपट बघितल्यावर तुरुंगाची हवा

उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन आपल्या विचित्र निर्णयांमुळे कायम चर्चेत असतो. दरम्यान, त्याने उत्तर कोरियात आता एक नवीन कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार उत्तर कोरियात मुलांच्या हॉलिवूड चित्रपट बघण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या चित्रपटामुळे मुलांवर वाईट संस्कार होतात, असा दावा किम जोंग उनने केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 2 Mar 2023
  • 06:04 pm
चित्रपट बघितल्यावर तुरुंगाची हवा

चित्रपट बघितल्यावर तुरुंगाची हवा

किम जोंग उनचे अजब फर्मान; मुलांच्या गुन्ह्याची शिक्षा आईबाप भोगणार

#प्योन्गयोंग 

उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन आपल्या विचित्र निर्णयांमुळे कायम चर्चेत असतो. दरम्यान, त्याने उत्तर कोरियात आता एक नवीन कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार उत्तर कोरियात मुलांच्या हॉलिवूड चित्रपट बघण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या चित्रपटामुळे मुलांवर वाईट संस्कार होतात, असा दावा किम जोंग उनने केला आहे.

हुकुमशाह किम जोंग उनने उत्तर कोरियात एक नवा कायदा लागू केला असून या कायद्यानुसार मुलांच्या हॉलिवूड चित्रपट बघण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जर एखादा मुलगा हॉलिवूड चित्रपट बघताना आढळला तर त्याच्या पालकाला सहा महिने लेबर कॅम्पमध्ये पाठवण्यात येणार आहे. तसेच मुलाला पाच वर्षाच्या तुरुंगवास भोगावा लागणार आहे. हॉलिवूड चित्रपटामुळे मुले समाजविरोधी बनत असून त्यांच्यावर वाईट संस्कार होतात, असा दावा किम जोंग उनने केला आहे.

डिसेंबर २०२२ मध्ये दिली होती शिक्षा

दरम्यान, डिसेंबर २०२२ मध्ये उत्तर कोरियामध्ये दोन शाळकरी विद्यार्थ्यांना दक्षिण कोरियन तसेच अमेरिकी चित्रपट पाहिल्याच्या गुन्ह्याखाली मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली होती. के-ड्रामा नावाने ओळखले जाणारे कोरियन चित्रपट पाहणे आणि त्यांचा प्रसार करणे हा उत्तर कोरियामध्ये गंभीर गुन्हा आहे. याच गुन्ह्याअंतर्गत ही शिक्षा करण्यात आली होती. कोरियामध्ये दोन शाळकरी विद्यार्थ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. दक्षिण कोरियन तसेच अमेरिकी चित्रपट पाहिल्याच्या गुन्ह्याखाली या दोन्ही विद्यार्थ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. के-ड्रामा नावाने ओळखले जाणारे कोरियन चित्रपट पाहणे आणि त्यांचा प्रसार करणे हा उत्तर कोरियामध्ये गंभीर गुन्हा आहे. याच गुन्ह्याअंतर्गत ही शिक्षा करण्यात आली.मृत्यूदंड देण्यात आलेल्या एका मुलाचं वय १६ तर दुसऱ्याचं १७ वर्ष होते.  या दोघांची ओळख उत्तर कोरियामधील रायनगांग प्रांतामधील शाळेत झाली होती. या दोघांनाही एकत्र अनेक दक्षिण कोरियन चित्रपट आणि अमेरिकी चित्रपट पाहिले होते.  या दोन्ही मुलांना सार्वजनिक ठिकाणी मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. एका शहरामधील चौकात या मुलांना ऑक्टोबरमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest