हॉलंडमध्ये सरसकट फुकट सनस्क्रीन
#ॲमस्टरडॅम
उन्हापासून त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रीनचा वापर केला जातो. नेदर्लंडमध्ये त्वचेच्या कर्करोगाचे प्रमाण लक्षणीय आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकार तिथल्या नागरिकांना केवळ उन्हाळ्यातच नाही तर प्रत्येक ऋतुत सनस्क्रीन वापरण्याचा सल्ला देते. त्वचेच्या कर्करोगाला आवर घालण्यासाठी सरकारने नागरिकांना मोफत सनस्क्रीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
आता प्रत्येक उन्हाळ्यात शाळा, विद्यापीठे, सार्वजनिक उद्याने आणि इतर ठिकाणी मोफत सनस्क्रीन उपलब्ध करून दिले जाणार आहे. सरकारच्या या मोहिमेनंतर देशातील प्रत्येक नागरिकाला सनस्क्रीन लावण्याची सवय लागेल, त्यामुळे देशातील घातक आजारांची व त्या आजाराच्या रुग्णांची संख्या कमी होईल, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.