‘लव्ह बाईट’मुळे युवक गेला जीवानिशी
#मेक्सिको
प्रणयात बेधुंद होणे स्वाभाविक असते. असे हळवे क्षण संबंधित युगलांच्या स्मृतीत कायमचे कोरले जात असतात. त्यामुळेच काहीजण प्रणयाच्या आठवणी शिल्लक रहाव्यात यासाठी जोडीदाराला चावे म्हणजेच 'लव्ह बाईट' घेत असतात. दरम्यान अशाच लव्ह बाईटमुळे मेक्सिकोत एका युवकाला आपला जीव गमवावा लागला असल्याची घटना समोर आली आहे.
जोडीदारासोबत प्रणय करताना वेगवेगळ्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे प्रमाण वरचेवर वाढत चालले आहे. प्रणयादरम्यान काही जोडप्यांना 'लव्ह बाईट' देणे आवडते. आपल्या जोडीदाराला लव्ह बाईट देऊन एक आठवण ठेवण्याचा प्रयत्न जोडपे करतात. विशेष म्हणजे नवरा-बायकोतही लव्ह बाईट देण्याची पद्धत प्रचलित असल्याचे बघायला मिळते. मात्र मेक्सिकोत एका युवतीने आपल्या मित्राला दिलेला लव्ह बाईट त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे. तिच्या
लव्ह बाईटने तिचा मित्र जीवानिशी गेला आहे. मॅक्सिको शहरात ज्युलिओ गोन्झलेज या युवकाचा मृत्यू लव्ह बाईटमुळे घडल्याचे समोर आले आहे.
त्याच्या मैत्रिणीने लव्ह बाईट दिल्यानंतर त्याला ह्रदयविकाराचा झटका आला. तिला भेटायला जाण्यापूर्वी त्याने दुपारी त्याच्या घरी आईवडिलांसोबत जेवण केले होते. त्यांनतर सायंकाळी तो मैत्रिणीसोबत होता. तिच्या जोरदार लव्ह बाईटमुळे त्याचे रक्त साकळले. रक्तप्रवाह बंद झला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. माणसाच्या दातामध्ये असलेल्या घटकांमुळे विषबाधा होऊ शकते. मुळात लव्ह बाईटमुळे स्किनवर खूप दिवस व्रण शिल्लक राहातो. त्यामळे चार चौघांमध्ये लोक वेगळ्या नजरेने बघतात. शिवाय लव्ह बाईटमुळे त्वचारोग होण्याचा धोका असतो. मात्र अशा प्रकारे लव्ह बाईटमुळे एखाद्याला आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडल्याने युवकांमध्ये प्रणयादरम्यान लव्ह बाईटबद्दल धास्ती निर्माण झाली आहे.
वृत्तसंस्था