तरुणाला सापडला दुर्मीळ 'सील' मासा
#सॅन डियागो
अमेरिकेतील सॅन डियागो शहरातील एका व्यक्तीने पॅसिफिक महासागरात सर्फिंगसाठी फेरफटका मारला. जगातील सर्वात मोठ्या पॅसिफिक महासागरात जाऊन सर्फिंग करणे खूप अवघड असते. पण ज्या लोकांमध्ये सर्फिंग करण्याचे कौशल्य असते, ते या महासागरात जाऊन व्हीडीओच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करत असतात, पण या महासागरात सर्फिंगला गेलेल्या तरुणाला एक दुर्मीळ मासा सापडल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
या माशाचा व्हीडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. माशाचा व्हीडीओ पाहून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. सॅन डियागो येथील स्थानिक फोटोग्राफर एड हर्टेल यांनी एका माध्यमांशी बोलताना या दुर्मीळ माशाबद्दल माहिती दिली. हा सील मासा असल्याचे एड याने सांगितले आहे. हर्टेल एड म्हणाला की, सील मासे पाण्याच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतात आणि सर्फबोर्डवर चढतात. पाण्यात उडी मारण्याआधी तो सील मासा पाच ते दहा मिनिटे सर्फबोर्डवर बसला होता. जर तुम्ही हा व्हीडीओ बारकाईने पाहिला तर तुम्हाला माहीत होईल की, सील मासा माणसांना घाबरत नाही. हा व्हीडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला असून वापरकर्ते वेग-वेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. सील माशाचा व्हीडीओ खूप सुंदर असल्याचे काही वापरकर्त्यांचे म्हणणे आहे. वृत्तसंस्था