महासत्ता दिवाळखोरीच्या वाटेवर

जगातील एकमेव महासत्ता असे बिरुद मिरवणारी अमेरिकाच आता डिफॉल्टर होण्याच्या मार्गावर आहे. नुकत्याच अमेरिकेतील दोन मोठ्या बँकांचे दिवाळे निघाले असून त्यामुळे देशातील सर्वसामान्य जनतेचा बँकांवरील विश्वास उडाला आहे. या पार्श्वभूमीवर खातेदारांनी मागच्या एकाच महिन्यात १ लाख कोटी डॉलरची रक्कम काढून घेतली आहे. त्यामुळे अन्य बँकांची अवस्था बिकट झाली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 5 Apr 2023
  • 09:54 am
महासत्ता दिवाळखोरीच्या वाटेवर

महासत्ता दिवाळखोरीच्या वाटेवर

#न्यूयॉर्क

जगातील एकमेव महासत्ता असे बिरुद मिरवणारी अमेरिकाच आता डिफॉल्टर होण्याच्या मार्गावर आहे. नुकत्याच अमेरिकेतील दोन मोठ्या बँकांचे दिवाळे निघाले असून त्यामुळे देशातील सर्वसामान्य जनतेचा बँकांवरील विश्वास उडाला आहे. या पार्श्वभूमीवर खातेदारांनी मागच्या एकाच महिन्यात १ लाख कोटी डॉलरची रक्कम काढून घेतली आहे. त्यामुळे अन्य बँकांची अवस्था बिकट झाली आहे. बँकांकडे खेळते भांडवल शिल्लक राहिलेले नाही. याचा फटका अमेरिकेचे चलन असलेल्या डॉलरला बसला असून अन्य देशांनी त्यांचे व्यवहार डॉलरमध्ये करणे थांबवले आहेत.

अनेक देशांनी आता डॉलरमध्ये व्यवहार करण्यापेक्षा स्थानिक चलनात व्यवहार सुरु केले आहेत. बहुतांश देश आपापल्या चलनात व्यवहार करायला लागले आहेत. जागतिक बाजारातील डॉलरचे मूल्य घसरले आहे. अमेरिकेचा नित्याचा सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर घसरला असून अमेरिका दिवाळखोरीच्या मार्गावर आहे. येत्या जुलैपर्यंत हीच अवस्था राहिल्यास अमेरिकेतील ७० लाखांहून अधिकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अमेरिकेच्या वित्तमंत्री जेनेट येलन यांनी जानेवारी २०२३ ला हा धोक्याचा इशारा दिला होता. केंद्र सरकारची कर्ज घेण्याची क्षमता वाढवण्याचा प्रस्ताव संसदेत मांडतानाच त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज व्यक्त केली होती. जर अमेरिकेला डिफॉल्टर घोषित करण्यात आले तर केवळ अमेरिकेच्याच नव्हे जागतिक अर्थकारणावर त्याचे दुष्परिणाम होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. केंद्र सरकारने कर्ज घेण्याची मर्यादा शिथिल करावी. १९६० पासून आजवर ७८ वेळा ही मर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे. दिवाळखोरीकडे वाटचाल करणाऱ्या बँकांना सरकार भांडवल उपलध करून देते, त्यासाठी सरकारलाही स्वतःला कर्ज घ्यावे लागते. अमेरिकेच्या फेडरल म्हणजेच मध्यवर्ती सरकारने अनेक वेळा असे कर्ज घेऊनच स्वतःची अब्रू वाचवलेली आहे.    

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest