Robot dog : न्यूयॉर्क पोलिसांच्या मदतीला रस्त्यावर पुन्हा उतरणार रोबोट श्वान

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी न्यूयॉर्क पोलीस विभाग तंत्रज्ञानाची मदत घेत असून ते आता रस्त्यावर रोबोट श्वानांना उतरवणार आहेत. हुंडाईच्या मालकीच्या बोस्टन डायनॅमिकने या श्वानांची निर्मिती केली आहे. स्पॉट नावाने ओळखल्या जाणाऱ्या डिगीडॉगची घोषणा न्यूयॉर्कचे महापौर एरिक ॲडम्स यांच्या उपस्थितीत न्यूयॉर्क पोलिसांनी केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 13 Apr 2023
  • 01:04 pm
न्यूयॉर्क पोलिसांच्या मदतीला रस्त्यावर पुन्हा उतरणार रोबोट श्वान

न्यूयॉर्क पोलिसांच्या मदतीला रस्त्यावर पुन्हा उतरणार रोबोट श्वान

#न्यूयॉर्क

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी न्यूयॉर्क पोलीस विभाग तंत्रज्ञानाची मदत घेत असून ते आता रस्त्यावर रोबोट श्वानांना उतरवणार आहेत. हुंडाईच्या मालकीच्या बोस्टन डायनॅमिकने या श्वानांची निर्मिती केली आहे. स्पॉट नावाने ओळखल्या जाणाऱ्या डिगीडॉगची घोषणा न्यूयॉर्कचे महापौर एरिक ॲडम्स यांच्या उपस्थितीत न्यूयॉर्क पोलिसांनी केली.

बीएसच्या माहितीनुसार हे डिगी डॉग संकटावेळी नागरिकांना मदत करतील. तसेच सब वे वर पाहणी करणे, बांधकाम स्थळांवर देखरेख ठेवणे अशी कामेही करणार आहेत. हे श्वान मनुष्यांशी संवाद साधणार आहेत. टाइम्स स्क्वेअरवरील  उद्घाटनावेळी यातील एका श्वानाने महापौरांशी, हॅलो, मेअर ॲडम्स, आम्ही तुमच्या मदतीसाठी आलो आहोत, अशा शब्दात संवाद साधला.        

महापौरांच्या कार्यालयानेही ट्विट करत डिगी डॉगचा फोटो शेअर केला आहे. त्याचबरोबर न्यूयॉर्क पोलीस विभागाचे कर्मचारी नव्या तंत्रज्ञानाचा कसा वापर करतील याचीही माहिती दिली आहे. त्यातील स्टार चेस सिस्टिम तंत्रामुळे दोन कारमधील धोकादायक पाठलाग टाळण्यासाठी कारवर जीपीएस टॅग करता येईल. हा जीपीएस हातातील उपकरणाद्वारे किंवा अन्य मार्गाने कारवर चढविता येईल. डिगी डॉगमध्ये के ५ एएसआर पायलट ही सुविधा असून त्याद्वारे काही ठराविक भागात अडचणीच्या वेळी पेट्रोल पुरविता येणार आहे.    

न्यूयॉर्क पोलीस आयुक्त किचांट सेवेल म्हणाले की, या नव्या तंत्रज्ञानाचा वापर पारदर्शी पद्धतीने सतत होईल. त्यासाठी नागरिकांची मदत घेण्यात येईल.  न्यूयॉर्क पोलीस प्रथमच तंत्रज्ञानाचा वापर करत नाहीत. या अगोदर २०२० मध्ये एक बंदुकधाऱ्यांने एक इमारतीचा वापर बॅरीकेडसारखा केला होता, तेव्हा त्याला ताब्यात घेण्यासाठी डिगी डॉगचा वपर केला होता. २०२१ मध्येही एका इमारतीत नेमके काय चालले आहे, याची माहिती घेण्यासाठी डिगी डॉगची मदत घेतली होती.वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest