पाण्याऐवजी दगड वाहून नेणारी नदी
#रुदरफोर्ड
जगात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यांचे रहस्य अद्याप उलगडलेले नाही. ही रहस्ये अशी आहेत की त्यांची उकल विज्ञानालाही करता आलेली नाही. अशी एक रहस्यमय नदी आहे, जिथे पाण्याऐवजी दगड आहेत. ऐकल्यानंतर तुम्हालाही विश्वास ठेवणे कठीण जाईल, परंतु नदीत पाण्याऐवजी दगड आहेत. शास्त्रज्ञांनाही या स्टोन रिव्हरबद्दल फारशी माहिती मिळालेली नाही.
रूदरफोर्डजवळून वाहणारी ही नदी निसर्गातीळ एक आश्चर्यच मानले जाते. स्टोन रिव्हरमध्ये सुमारे ६ किलोमीटरपर्यंत फक्त दगडच दिसतील. हा दगड नदीच्या प्रवाहासारखा दिसतो. वास्तविक, ही नदी अमेरिकेच्या टेनेसी प्रांतात आहे जिथे मोठ्या प्रमाणात जड दगड आहेत. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या नदीत पाण्याचा थेंबही नाही. इथे तुम्हाला फक्त दगड बघायला मिळतील. या नदीत छोटे ते मोठे दगड आहेत. येथे १० टन वजनाचे दगड सुमारे ६ इंचांपर्यंत बुडालेले आहेत. त्यामुळेच इथे झाडे उगवत नाहीत. विशेष म्हणजे नदीच्या आजूबाजूचे वातावरण अतिशय हिरवेगार आहे. या नदीविषयी ऐकून तुमच्या मनात असाच विचार येत असेल की या नदीत पाण्याच्या जागी दगड कसे आले? काही लोक याला निसर्गाचा चमत्कार मानत आहेत. आजूबाजूचे वातावरण पाहता या नदीत पाण्याचा थेंबही नसेल असे अजिबात वाटत नाही. पण नदीतील दगडांबाबत शास्त्रज्ञांचा स्वतःचा सिद्धांत आहे. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, हे दगड १० हजार वर्षांपूर्वी हिमनद्या तुटल्यामुळे उंच शिखरांवरून पडले असावेत, आणि ही नदी तयार झाली असावी. मात्र, कारण काहीही असो, स्टोन रिव्हर नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेत असते. आजही ही नदी वैज्ञानिकांसाठी एक मोठे न उलगडलेले कोडे आहे. वृत्तसंस्था