दोन पायांवर उभे असलेले माणूस की अस्वल?
#हँगझो
वेगवेगळ्या प्राणीसंग्रहालयांमधल्या प्राण्यांचे चित्रविचित्र, कधी धक्का दायक, विनोदी व्हीडीओ सतत व्हायरल होत असतात. त्यांचा मनसोक्त आनंदसुद्धा लोक घेतात. पण काही व्हीडीओ मात्र विचारात पाडतात आणि निसर्गाच्या आश्चर्यांवर विचार करायला लावतात. सध्या चीनच्या प्राणी संग्रहालयातील एक व्हीडीओ चर्चेचा विषय बनला आहे.
सध्या असाच एक व्हीडीओ व्हायरल होत आहे. ज्यात प्रेक्षकांच्या गर्दीकडे बघत एक अस्वल दोन पायांवर उभा दिसत आहे. चीनच्या हँग्झूम झू या प्राणीसंग्रहालयातल्या या काळ्या अस्वलाचा दोन पायांवर उभे राहून प्रेक्षकांकडे बघत असल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला. त्यात चक्क अस्वल मागच्या दोन पायांवर उभा असल्याचं दिसत आहे. आणि प्रेक्षकांकडे बघून जणू संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. एका जंगली प्राण्याने जो चार पायांवर चालतो त्याने दोन पायांवर उभे राहणे ही घटना आश्चर्यकारक वाटते.
असे फक्त कार्टून अॅनिमेशनमध्येच बघायला मिळते. शिवाय या जंगली प्राण्याचे धीटाइने प्रेक्षकांकडे बघत उभे राहणे यामुळेही लोकांना आश्चर्य वाटले. त्यामुळे हा खरा अस्वल नसून प्राणीसंग्रहालयातल्या एखाद्या कर्मचाऱ्याने अस्वलाचे चुकीच्या फिटींगचे कपडे घातले असल्याची अफवा सगळीकडे पसरली.या अफवेचा व्हीडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने प्राणीसंग्रहालय प्रशासनाला याचा खुलासा करणारे ट्वीट करावे लागले आहे. त्यात त्यांनी तो अस्वल स्वतःच उत्तर देत असल्याप्रमाणे लिहिले आहे की, "मी अँजला आहे. मी एक सन बेअर आहे. मला काल प्रशासनाकडून फोन आला की, मी आळशी झाला असून काम टाळत आहे का? आणि माझी जागा एका माणसाला घेण्याची गरज पडत आहे. मी कोणीही अस्वलाचे कपडे घातलेला कर्मचारी नाही."
प्रशासनाने केलेले हे रिट्वीटसुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यावरही लोक भरभरून कमेंट आणि लाइक्स करत आहेत.