अबुधाबीनंतर आणखी एका मुस्लीम देशात बनणार हिंदू मंदिर
बोचसनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (बीएपीएस) मंदिराच्या उद्घाटनानंतर आणखी एक मुस्लीम देशात मंदिर बनत आहे. त्या देशाचं नाव आहे बहरीन.
बहरीन येथेही बीएपीएस मंदिर उभारणार आहे. त्यासाठी जमीन अधिग्रहण झालेले असून मंदिर उभारण्यासाठीच्या सगळ्या औपचारिकता पूर्ण झालेल्या आहेत. लवकरच मंदिर निर्माणकार्य सुरू होणार आहे.
बहरीन येथे उभारण्यात येणारं मंदिर अबुधाबी येथील मंदिराप्रमाणेच भव्य असेल. या मंदिराचं निर्माण बोचसनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या वतीने होणार आहे. अबुधाबी येथील मंदिराचा खर्च ७०० कोटी इतका आहे. बहरीन इथल्या मंदिरासाठीही भरपूर खर्च होणार आहे. बीएपीएसच्या प्रतिनिधी मंडळाने बहरीनचे क्राऊन प्रिन्स सलमान बिन हमाद अल खलिफा यांची भेट घेतली आहे. त्यासाठी जमीन अधिग्रहण झालेलं असून मंदिर उभारण्यासाठीच्या सगळ्या औपचारिकता पूर्ण झालेल्या आहेत. त्यातच लवकर मंदिर निर्माणकार्य सुरू होणार आहे. बहरीन येथे उभारण्यात येणारं मंदिर अबुधाबी येथील मंदिराप्रमाणेच भव्य असेल.