संग्रहित छायाचित्र
टोकियो: कोरोना नावाच्या एका भयंकर विषाणूपासून जग आता कुठे सावरलं आहे, तर जपानमधल्या एका जीवघेण्या आजाराने सर्वांची चिंता वाढवली आहे. जपानमधल्या या आजारामुळे व्यक्तीचा फक्त ४८ तासांत मृत्यू होतो, असं म्हटलं जातंय. त्यामुळे दहशत निर्माण झाली आहे. जपानमध्ये एक जीवघेणा आजार वेगाने पसरत आहे. हा आजार बॅक्टेरियामुळे होतो. हा बॅक्टेरिया मानवी शरीरात प्रवेश करतो आणि ऊतींना नष्ट करतो. त्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्यास या आजाराचा संसर्ग झाल्यानंतर ४८ तासांच्या आत रुग्णाचा मृत्यू होतो.
स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम (एसटीएसएस) असे या आजाराचे नाव आहे. जपानमध्ये याची आतापर्यंत ९०० हून जास्त प्रकरणे नोंदवली गेली आहेत. जपानशिवाय युरोपमधल्या काही देशांमध्ये या आजाराची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. जगभरात अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. यातला एक बॅक्टेरिया म्हणजे स्ट्रेप्टोकोकस आहे. हा बॅक्टेरिया मानवांना संसर्ग करतो. हा बॅक्टेरिया एखाद्या प्राण्याकडून किंवा कीटकाकडून मानवी शरीरात प्रवेश करतो. हा बॅक्टेरिया रक्त आणि टिश्यूज अर्थात ऊतींमध्ये प्रवेश करतो आणि त्यांचं काम नीट होऊ देत नाही. त्यामुळेच या बॅक्टेरियाची लागण झाल्यावर वेळेवर उपचार न मिळाल्यास ४८ तासांत रुग्णाचा मृत्यू होतो.
कसा ओळखायचा हा आजार?
एसटीएसएसचं निदान करण्यासाठी कोणतीही विशिष्ट टेस्ट नाही. बाधित रुग्णामध्ये ही तीन लक्षणं दिसली तर डॉक्टर रुग्णाच्या रक्ताचा नमुना घेतात आणि त्याच्या विविध चाचण्या करतात. यामध्ये लो बीपी आणि एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त अवयवांमध्ये समस्या असल्यास त्याची तपासणी केली जाते.
काय आहेत गुणधर्म?
हे बॅक्टेरिया जखमेतून त्यातून शरीरात प्रवेश करतात. तो कोणत्याही पृष्ठभागावर असू शकतो. तो उघड्या जखमेच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतो. अगदी अशाच प्रकारे टिटॅनस निर्माण करणारे बॅक्टेरियाही शरीरात प्रवेश करतात; पण एसटीएसएसने ग्रस्त असलेल्या निम्म्या व्यक्तींच्या शरीरात हे बॅक्टेरिया कसे पोहोचतात हे तज्ज्ञांना अजून माहिती नाही. हा नक्कीच त्याच्या ट्रान्समिशनचा एक मार्ग नक्कीच आहे. अशा रुग्णांचीही अनेक उदाहरणे आहेत ज्यांच्यामध्ये या आजाराची लक्षणे जखम झाल्यावर झपाट्याने विकसित होतात. यामुळे शरीराच्या अवयवांना सूज येते आणि सतत खूप जास्त ताप येऊ लागतो. मात्र, स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम हा नवीन आजार नाही. त्याची प्रकरणे जपानमध्ये यापूर्वीही नोंदवली गेली आहेत. हा बॅक्टेरियामुळे होणारा आजार असल्याने तो पूर्णपणे थांबवता येत नाही. या आजाराची प्रकरणे जपानमध्ये १९९९ पासून नोंदवली जात आहेत. दरवर्षी, एसटीएसएसमुळे शेकडो लोक आजारी पडतात, त्यापैकी अनेकांचा मृत्यूही होतो. जेव्हा हा बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करतो तेव्हा रुग्णाला ताप आणि लो बीपीचा त्रास होतो. बॅक्टेरिया अशा प्रकारे हल्ला करतात की शरीरातल्या टिश्यूज नष्ट होऊ लागतात. यामुळे रुग्णाच्या शरीरातील अवयव निकामी होतात. या बॅक्टेरियाला शरीरात प्रवेश करून टिश्यूजवर हल्ला करण्यासाठी काही तास लागतात. या कालावधीत रुग्णाला उपचार न मिळाल्यास तो अवयव निकामी होतो आणि परिणामी त्याचा मृत्यू होतो. हा बॅक्टेरिया हृदय, किडनी आणि लिव्हर किंवा इतर कोणत्याही अवयवावर हल्ला करू शकतो. हा बॅक्टेरिया टिश्यू नष्ट करत असल्याने त्याला मांस खाणारा बॅक्टेरिया असे म्हणतात.