ग्रीकजवळ बोट बुडून ७८ जणांचा मृत्यू

नायजेरियातील क्वारा प्रांतातील दुर्घटनेनंतर स्थलांतरितांना घेऊन जाणारी एक बोट ग्रीकच्या किनाऱ्याजवळ बुडाल्याचे समोर आले आहे. मच्छीमारांची एक बोट ग्रीकच्या दक्षिण किनाऱ्याजवळ बुडाल्याने किमान ७८ जणांचा बुडून मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी बुधवारी (१४ जून) सांगितले. या बोटीवरील सगळे प्रवासी स्थलांतरीत होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Fri, 16 Jun 2023
  • 12:36 am
ग्रीकजवळ बोट बुडून ७८ जणांचा मृत्यू

ग्रीकजवळ बोट बुडून ७८ जणांचा मृत्यू

इटलीकडे जाणारी बोट बुडाली, बोटीत ४०० प्रवासी असल्याचा अंदाज

#अथेन्स

नायजेरियातील क्वारा प्रांतातील दुर्घटनेनंतर स्थलांतरितांना घेऊन जाणारी एक बोट ग्रीकच्या किनाऱ्याजवळ बुडाल्याचे समोर आले आहे. मच्छीमारांची एक बोट ग्रीकच्या दक्षिण किनाऱ्याजवळ बुडाल्याने किमान ७८ जणांचा बुडून मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी बुधवारी (१४ जून)  सांगितले. या बोटीवरील सगळे प्रवासी स्थलांतरीत होते.

इटलीला जाणारी ही बोट पूर्व लिबियाच्या तोब्रुक भागातून प्रवासाला निघाल्याचे सांगितले जाते.  या अपघातात शेकडो जण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव व आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या दुर्घटनेत जखमींना बाहेर काढण्यासाठी तटरक्षक दलाची सहा जहाजे, नौदलाचे एक जहाज, लष्कराचे वाहतूक विमान आणि हवाई दलाचे हेलिकॉप्टर यांची मदत घेण्यात आली आहे. तसेच ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने पाण्यात अडकून असलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत ३० इजिप्शियन, १० पाकिस्तान, ३५ सीरिया आणि तीन  पॅलेस्टिनी नागरिकांचा वाचवण्यात यश आले आहे. समुद्रात बुडालेली बोट सापडली की नाही याची माहिती अद्याप मिळालेली नाही. सुटका करण्यात आलेल्या लोकांना कलामाता शहरात नेण्यात आले आहे. येथील महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व लोकांचे वय १६ ते ४१ वर्षादरम्यान आहे. बोटीत महिला आणि लहान मुलेही होती. संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी बोट बुडण्याची घटना भयानक असल्याचे म्हटले आहे.

इटालियन तटरक्षक दलाने ग्रीक अधिकाऱ्यांना सर्वप्रथम या बोटीबाबत कळवले होते. स्थानिक तटरक्षक दलाच्या गस्ती पथकांना टाळण्यासाठी मानवी तस्करी करणारे गुहेगार ग्रीकच्या मुख्य किनाऱ्याजवळ असलेल्या आंतरराष्ट्रीय समुद्रात मोठ्या  बोटी नेण्याचे प्रमाण वाढले आहे.  बोट बुडाल्यानंतर या भागात व्यापक शोध आणि बचाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. ग्रीकच्या दक्षिणेकडील पेलोपोनेसे भागाच्या नैऋत्य दिशेला ७५ किलोमीटर अंतरावर घडलेल्या या दुर्घटनेतील १०४ लोकांना वाचवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest