Myanmar army attack : म्यानमार लष्कराच्या हल्ल्यात १०० मुत्युमुखी

म्यानमारच्या लष्कराने केलेल्या एका हवाई हल्ल्यात १०० हून अधिक नागरिक मारले गेले आहेत. म्यानमारच्या लष्करानेच हल्ल्याचे वृत्त दिले आहे. त्यांच्या माहितीनुसार एका खेड्यात घुसखोरांनी ग्रामस्थांची बैठक आयोजित केली होती.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 13 Apr 2023
  • 12:57 pm
म्यानमार लष्कराच्या हल्ल्यात १०० मुत्युमुखी

म्यानमार लष्कराच्या हल्ल्यात १०० मुत्युमुखी

सांगेग भागातील खेड्यामध्ये कार्यक्रमावेळी केला जेट विमानातून बॉम्बवर्षाव, हेलिकॉप्टरमधून गोळीबार

#नाएप्पिडॉ 

म्यानमारच्या लष्कराने केलेल्या एका हवाई हल्ल्यात १०० हून अधिक नागरिक मारले गेले आहेत. म्यानमारच्या लष्करानेच हल्ल्याचे वृत्त दिले आहे. त्यांच्या माहितीनुसार एका खेड्यात घुसखोरांनी ग्रामस्थांची बैठक आयोजित केली होती. दहशतवाद्यांनी अयोजित केलेल्या बैठकीला ग्रामस्थांनी पाठिंबा दिल्याने हा हल्ला केल्याचे लष्कराने सांगितले आहे उत्तर-पशचिम म्यानमारच्या सागेंग भागातील एका खेड्यावर मंगळवारी हा हल्ला झाला असून त्यात नागरिकही मृत्युमुखी पडले असून या घटनेचे म्यानमारच्या लष्कराने समर्थन केले आहे. मृतांमध्ये मुले आणि महिलांचाही समावेश होता. गेल्या काही काळात म्यानमारच्या लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यांतील हा सर्वाधिक तीव्रतेचा हल्ला म्हणावा लागेल. 

शांततेचा नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या आँग सान सू क्वेइ यांचे ललोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार २०२१ मध्ये एका बंडाद्वारे लष्कराने उलथवून लावले असून तेव्हांपासून देशात अस्थिरता आणि अशांतता असल्याचे पाहावयास मिळतात. २०२१ अगोदरच्या दशकात आँग सान यांनी काही सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता.    

लष्करशाहीला विरोध करणाऱ्या काही घटकांना सशस्र विरोध करण्याचा जागोजाग प्रयत्न केला असून त्याला वांशिक अल्पसंख्यक घुसखोरांचा पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या कारवायांना प्रत्युत्तर देताना म्यानमारच्या लष्कराने एनेक टिकाणी हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांत मोठ्या प्रमाणावर शस्रास्ऱ्ांचा वापर झाला असून हे हल्ले नागरी वस्तीवरही केले आहेत. दरम्यान संयुक्त राष्ट्र सरचिटमीस ॲन्टोनिओ गुटेरस यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून सागेंग भागातील हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, असे म्यानमारच्या लष्कराला सुनावले आहे. म्यानमारमधील जनतेच्या विरोधात सुरू असलेल्या या हिसंक हल्ल्यांचा लष्कराने शेवट केला पाहिजे. 

म्यानमारमधील लष्करी राजवटीचे प्रवक्ते जॉ मिन तुन एका सरकारी चॅनेलवर म्हणाले की, सागेंग भागातील शांतता आणि स्थैर्याची पुनर्स्थापना करण्याचा प्रशासनाचा निर्धार आहे. सशस्र पीपल्स डिफेन्स फोर्सने आयोजित केलेला उद्घाटनाचा कार्यक्रम हा सरकारविरोधी होता. तेथे प्रतिसरकार चालवणाऱ्या नॅशनल युनिटी गव्हर्नमेंटला त्यांचा पाठिंबा होता. त्यांचा कार्यक्रम सुरू असताना केलेल्या हल्ल्यांत पीपल्स डिफेन्स फोर्सचे सदस्य मारले गेले. त्याचा देशातील सरकारला आणि नागरिकांना विरोध असल्याने त्यांच्यावर कारवाई करणे क्रमप्राप्त होते.          

उत्तरेच्या काचिन प्रांतात ऑक्टोबरमध्ये केलेल्या जेटच्या हवाई हल्ल्यात ५० जण मारले गेले होते. त्यात काही कलाकार आणि वांशिक अल्पसंख्य घुसखोर सदस्य होते.  नॅशनल युनिटी गव्हर्नमेंटचे प्रवक्ते केया जॉ म्हणाले की, जेट विमानांनी मंगळवारी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात किमान १०० जण मारले गेले आहेत. जेटच्या हल्ल्यानंतर हेलिकॉप्टरद्वारे गोळ्यांचा वर्षाव केला गेला. लष्कराने केलेला हा आणखी एक मानवताविरोधी, रानटी हल्ला असून त्यांना मानवी संवेदनाशी काहीही देणेघणे नाही. नागरिकांवर हल्ला केल्याच्या आरोपाचा लष्कराने इन्कार केला असून आमचा हल्ला देश अस्थिर करणाऱ्या दहशतवांद्याविरूद्ध आहे. म्यानमारवर ६० वर्षे लष्कराचे राज्य असून विविधता असणारा हा देश आपणच एकत्र ठेऊ शकतो असा लष्कराचा दावा आहे. ७७ वर्षांच्या आँग सान यांनी वेगवेगळ्या आरोपाखाली आपल्या आयुष्यातील ३३ वर्षे तुरुंगात काढली आहेत. त्यांनी आपल्यावरील आरोपांचा इन्कार केला असून त्यांचा पक्षही विसर्जित करण्यात आला आहे.वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest