मॅक्सवेलच्या वादळात वेस्ट इंडिजची वाताहत

वादळी फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने झळकावलेल्या तडाखेबाज वेगवान शतकाच्या जोरावर हाय स्कोअरिंग टी-२० सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा ३४ धावांनी पराभव केला.

WestIndiesduringCycloneMaxwell

मॅक्सवेलच्या वादळात वेस्ट इंडिजची वाताहत

सलग दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेिलयाने दोनशेपार मजल मारताना ४ बाद २४१ धावा फटकावल्या. यात मॅक्सवेलने अवघ्या ५५ चेंडूंत ८ षटकार आणि १२ चौकारांच्या मदतीने नाबाद १२० धावांचा पाऊस पाडला. त्यानंतर टीम डेव्हिडने १४ चेंडूंत नाबाद ३१ तर कर्णधार मिचेल मार्शने १२ चेंडूंत २९ धावा फटकावल्या. प्रत्युत्तरात, िवंडीजनेही सलग दुसऱ्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना दोशेपार धावा केल्या. मात्र, यावेळीही हा संघ विजयापासून वंचित राहिला. विंडीजला २० षटकांत ९ बाद २०७ धावा करता आल्या. यात कर्णधार रोवमन पाॅवेलने सर्वाधिक ६३ (३६ चेंडूंत ४ षटकार, ५ चौकार) तर आंद्रे रसेलने ३७ (१६ चेंडूंत २ षटकार, ४ चौकार) योगदान दिले. ऑस्ट्रेलियातर्फे मार्कस स्टाॅइनसने ३६ धावांत ३ बळी घेतले. याबरोबर ऑस्ट्रेलियाने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

मॅक्सवेलने या शतकी खेळीदरम्यान भारतीय दिग्गज रोहित शर्मा याची बरोबरी केली. त्याने कारकिर्दीत पाचव्यांना टी-२० आंतरराष्ट्रीय शतक साकारले. या शतकासोबतच त्याने रोहित शर्मा याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय शतकांची बरोबरी केली. आता दोघांच्या नावावर प्रत्येकी ५ शतके आहेत.वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story