मुलीपासून दूर राहणे अवघड, पण... : दीपिका

मुलीपासून दूर राहणे अवघड आहे, पण ऑलिम्पिक पदकही महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया भारताची स्टार तिरंदाज दीपिकाकुमारीने ऑलिम्पिक सुरू होण्यापूर्वी व्यक्त केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 22 Jul 2024
  • 04:08 pm
stay away from a girl, sports, difficult,  Olympic medal is also important, olympics, Deepika Kumari, India's star archer

संग्रहित छायाचित्र

जॉक्स (फ्रान्स): मुलीपासून दूर राहणे अवघड आहे, पण ऑलिम्पिक पदकही महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया भारताची स्टार तिरंदाज दीपिकाकुमारीने ऑलिम्पिक सुरू होण्यापूर्वी व्यक्त केली.

एकीकडे दीड वर्षाची मुलगी आणि दुसरीकडे ऑलिम्पिक पदकाची आकांक्षा, अशा कात्रीत भारताची तिरंदाज दीपिका कुमार अडकली आहे. मात्र, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून ऑलिम्पिकमध्ये यशस्वी कामगिरी करण्यास ती सज्ज झाली आहे.

‘‘मुलीपासून दूर राहण्याचे दु:ख शब्दांत मांडणे खूप अवघड आहे. मात्र, ऑलिम्पिक पदकही मला खुणावत आहे. यासाठी मी खूप वर्षे मेहनत घेतली आहे. पॅरिसला रवाना होण्यापूर्वी मी पती अतानू दासच्या साथीने मुलगी वेदिकाला पुण्यातील लष्कराच्या क्रीडा केंद्रात बरोबर घेऊन आले. या वेळी माझ्यापेक्षा मुलीने दाखवलेला संयम महत्त्वाचा होता. पती अतानू आणि माझ्या सासरच्यांशी तिने छान जुळवून घेतले आहे. त्यामुळेच मी निर्धास्त होऊन ऑलिम्पिकसाठी येऊ शकले,’’ असे दीपिकाने सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story