संजू सॅमसन, अभिषेक शर्मा यांना वगळल्यामुळे थरुर यांचा संताप

नवी दिल्ली: श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन आणि स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा यांची वनडे संघात निवड न झाल्याने काँग्रेस नेते आणि लोकसभा खासदार शशी थरूर यांनी संताप व्यक्त केला आहे.  

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 20 Jul 2024
  • 11:25 am
Sanju Samson, Abhishek Sharm, MP Shashi Tharoor

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली: श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन आणि स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा यांची वनडे संघात निवड न झाल्याने काँग्रेस नेते आणि लोकसभा खासदार शशी थरूर यांनी संताप व्यक्त केला आहे.  

लंकेविरुद्ध  संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनासंधीदेण्यात न आल्याने क्रिकेट चाहते प्रचंड संतापले आहेत. यात आता थरुर यांचीही भर पडली. सॅमसनने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावले होते. त्यानंतर त्याची वनडेत निवड झाली नाही. दुसरीकडे, झिम्बाब्वे दौऱ्यावर अभिषेकने शानदार शतक झळकावले. असे असूनही त्याला संघात स्थान मिळवता आले नाही.

संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांची निवड न केल्यामुळे थरूर यांनी बीसीसीआयवर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी संघ निवडीवर टीका केली आहे.  “या महिन्याच्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड मनोरंजक आहे. आपल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणाऱ्या संजू सॅमसनची वनडे संघात निवड झालेली नाही. त्याचवेळी भारत विरुद्ध झिम्बाब्वे मालिकेत टी-२० शतक झळकावणाऱ्या अभिषेक शर्माची कोणत्याच संघात निवड झालेली नाही. तरीही संघाला शुभेच्छा,” असे ट्विट थरुर यांनी केले आहे.

झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत अभिषेकने आपल्या निडर फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. पंजाबच्या या फलंदाजाने आपल्या दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले होते, पण नंतर यशस्वी जैस्वाल संघात आल्यावर तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करु लागला.

सॅमसन आणि अभिषेक या दोघांनाही एकदिवसीय आणि टी-२० संघात स्थान मिळण्याची अपेक्षा होती, परंतु आश्चर्यकारकपणे त्यांना वगळण्यात आले. सॅमसनला टी-२० संघात निश्चितच स्थान मिळाले. शशी थरूर यांनी एक्सवर आपले मत मांडताना आणि निवड मनोरंजक असल्याचे वर्णन केले.  वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest