ट्रेंट बोल्ट घेणार कांगारुंची परीक्षा

डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाचे न्यूझीलंडच्या टी-२० संघात पुनरागमन

ट्रेंट बोल्ट घेणार कांगारुंची परीक्षा

#वेलिंग्टन

न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. धोकादायक डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट संघात परतला असून त्याला सामोरे जाणे ही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांसमोरील मोठी परीक्षा असेल.

टी-२० विश्वचषक स्पर्धेत बोल्ट न्यूझीलंडकडून खेळणार आहे. त्याच्या तयाीचा भाग म्हणून तो या मालिकेत खेळत आहे. बोल्ट सध्या संयुक्त अरब अमिरातमध्ये ‘एमआय अमिरातीज’ संघाकडून इंटरनॅशनल लीग टी-२० स्पर्धा खेळत आहे. त्याचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. स्पर्धेचा अंतिम सामना १९ फेब्रुवारीला होणार आहे, त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला टी-२० खेळू शकणार नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. तो टीम साऊदीची जागा घेईल. २१, २३ आणि २५ फेब्रुवारी रोजी उभय संघांत तीन सामने होणार आहेत.

ट्रेंट बोल्ट नोव्हेंबर २०२२ मध्ये न्यूझीलंडकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यावेळी टी-२० विश्वचषकातील उपांत्य फेरीत त्याच्या संघज्ञला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर तब्बल १५ महिन्यांनी तो  आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळणार आहे. बोल्ट हा न्यूझीलंडच्या केंद्रीय कराराचा भाग नाही, म्हणूनच तो सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी उपलब्ध नाही. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना भारताविरुद्ध खेळला. उपांत्य फेरीच्या या सामन्यात न्यूझीलंडला  यजमान भारतीय संघाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते.

न्यूझीलंडच्या मर्यादित षटकांचा कर्णधार केन विल्यमसन ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका खेळणार नाही. तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठी त्यांनी पितृत्व रजा मागितली होती, ती मंजूर झाली आहे. विल्यमसनच्या अनुपस्थितीत डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनर न्यूझीलंडचे कर्णधार असेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दुखापत झालेला डॅरिल मिशेल ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळू शकणार नाही.  मिशेल गेल्या ६ महिन्यांपासून दुखापतीशी झुंजत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तो तंदुरुस्त राहावा यासाठी त्याला सावरण्यासाठी वेळ देण्यात आला होता.

डॅरिल मिशेलच्या जागी न्यूझीलंडने २७ वर्षीय अष्टपैलू खेळाडू जोश क्लार्कसनला संघात संधी दिली आहे. क्लार्कसनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले असले तरी तो अद्याप एकही टी-२० सामना खेळलेला नाही. २०२०पासून त्याने देशांतर्गत टी-२० क्रिकेटमध्ये १६०पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत.वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest