महाराष्ट्राच्या तेजस शिरसेला अडथळा शर्यतीत सुवर्णपदक

मुंबई- जागतिक ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर चॅलेंजर स्तरीय स्पर्धा मोटोनेट जीपी मालिकेत औरंगाबादमधील तेजस शिरसेने महाराष्ट्राचे नाव उंचावर नेत लक्षवेधक कामगिरी केली आहे. पुरुषांच्या ११० मीटर अडथळा शर्यतीत राष्ट्रीय विक्रम मोडीत काढताना तेजसने सुवर्णपदक जिंकले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Fri, 24 May 2024
  • 04:38 pm
Tejas Shirse

संग्रहित छायाचित्र

जागतिक ॲथलेटिक्समध्ये ११० मीटर अडथळा शर्यतीत नोंदवली विक्रमी १३.४१ सेकंद वेळ

मुंबई- जागतिक ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर चॅलेंजर स्तरीय स्पर्धा मोटोनेट जीपी मालिकेत औरंगाबादमधील तेजस शिरसेने (Tejas Shirse) महाराष्ट्राचे नाव उंचावर नेत लक्षवेधक कामगिरी केली आहे.  पुरुषांच्या ११० मीटर अडथळा शर्यतीत राष्ट्रीय विक्रम मोडीत काढताना  तेजसने सुवर्णपदक जिंकले आहे.

२०१७ मध्ये सिद्धांत थिंगल्यने (Siddhant Thingalya) १३.४८ सेकंदांचा विक्रम केला होता. त्याचा हा विक्रम आता तेजस शिरसेने मोडून १३.४१ सेकंदाचा नवा विक्रम नोंदवला आहे. तेजसने ९ मे रोजी नेदरलँड्समध्ये १३.५६ सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली होती. शिरसेने आतापर्यंत कोणतेही आंतरराष्ट्रीय पदक जिंकलेले नाही. पुरुषांच्या ११० मीटर अडथळा शर्यतीत तो अव्वल भारतीय आहे. त्याने गेल्या वर्षी फेडरेशन कप, राष्ट्रीय आंतरराज्य चॅम्पियनशिप आणि नॅशनल ओपनमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. परदेशातील प्रशिक्षण आणि स्पर्धेत सहभागामुळे त्याने यंदाच्या फेडरेशन कपमध्ये भाग घेतला नव्हता. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ११० मीटर अडथळा शर्यतीसाठी स्वयंचलित पात्रता गुण १३.२७ सेकंद आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ११० मीटर अडथळा शर्यतीत ४० खेळाडू भाग घेतील. यातील निम्मे जागतिक क्रमवारीत स्थान मिळवतील.

ॲथलेटिक्समध्ये धावण्यासोबतच उंच उडी, लांब उडी, तिहेरी उडी आणि बांबू उडी असे प्रकार असतात. यामध्ये अडथळा शर्यत हा प्रमुख प्रकार शर्यतीमध्ये असतो. तेजस सध्या अडथळा शर्यतीतील उत्कृष्ट राष्ट्रीय खेळाडू आहे. तेजस अशोक शिरसे (२१) हा देवगाव रंगारी येथील अल्पभूधारक शेतकरी अशोक शिरसे यांचा मुलगा आहे. दौलताबादमध्ये महाराष्ट्र पब्लिक स्कूलमधे इयत्ता १० वी चे शिक्षण घेताना शाळेतील क्रीडा प्रशिक्षक पूनम राठोड यांनी तेजसमधले धावपटूचे गुण ओळखले. त्यांनी केंद्राच्या साई क्रीडा प्रबोधिनीकडे सरावासाठी जाण्याचा सल्ला दिला. तेजसच्या दुर्देवाने तेथे शिकण्यासाठी तेथील शिक्षकांनी महिना ५ हजार रुपयांची लाच मागितली. या प्रकारानंतर तेजसला पूनम राठोड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रशिक्षणासाठी पाठवले. तेथील प्रशिक्षक सुरेंद्र मोदी यांनी तेजसमधील गुण ओळखून त्याला प्रोत्साहित केले. त्याचा सर्व खर्च उचलून तेजसकडून सराव करून घेतला.

त्याने २०१६ मध्ये दिल्लीतील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest