ILP 2024: चेन्नई सुपर किंग्जने जिंकला यावर्षीचा पहिला सामना

आयपीएलमध्ये एकूण पाच वेळा अजिंक्य राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या विजयाने या वर्षीच्या स्पर्धेला सुरुवात झाली आहे.

IPL 2024, CSK, RCB, IPL first match

संग्रहित छायाचित्र

आयपीएलमध्ये एकूण पाच वेळा अजिंक्य राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या विजयाने या वर्षीच्या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. चेन्नईचा नवा कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा ६ गडी राखून पराभव केला. चेन्नईच्या चेपॉक मैदानावार या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. 

नाणेफेक जिंकून आरसीबीने पहिल्यांदा फलंदाजी करत २० षटकांत ६ गडी गमावून १७३ धावा ठोकल्या. सीएसकेने  १८.४ षटकांत ४ गडी गमावून हे लक्ष्य गाठले. सीएसकेच्या शिवम दुबे (३४) आणि रवींद्र जडेजा (२५) यांनी पाचव्या विकेट साठी नाबाद ६६ धावा जोडल्या. त्यांच्या भागीदारीच्या जोरावर सीएसकेने हा सामाना सहज जिंकला. 

चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा ६ गडी राखून पराभव केला. 

धावफलक

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर - फलंदाजी

विराट कोहली (२१ धावा, २० चेंडू, १ षटकार)

फाफ डू प्लेसिस (३५ धावा, २३ चेंडू, ८ चौकार)

अनुज रावत (४८ धावा, २५ चेंडू, ४ चौकार, ३ षटकार)

दिनेश कार्तिक, नाबाद (३८ धावा, २६ चेंडू, ३ चौकार, २ षटकार)

चेन्नई सुपर किंग्ज - फलंदाजी

ऋतुराज गायकवाड (१५ धावा, १५ चेंडू, ४ चौकार)

रचीन रवींद्र (३७धावा, १५ चेंडू, ३ चौकार, ३ षटकार)

अजिंक्य रहाणे (२७धावा, १९ चेंडू, २ षटकार)

शिवम दुबे (३४ धावा, २८  चेंडू, ४ चौकार, १ षटकार)

रवींद्र जडेजा (२५धावा, १७ चेंडू, १ षटकार)

गोलंदाजी

चेन्नई सुपर किंग्जच्या मुस्ताफीजुर रहमान याने ४ गडी तर दीपक चहरने १ गडी बाद केला. 

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या यश दयाल, कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी १ तर  कॅमेरून ग्रीन याने २ गडी बाद केले. 

 

आजचा सामना (२३ मार्च २०२४)

पंजाब विरुद्ध दिल्ली, दुपारी ३.३० वाजता

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest