नेपाळमध्ये घडला इतिहास

पहिल्यांदाच लागले लेस्बियन जोडप्याचे लगीन!, अधिकृत नोंदणी करत 'त्या दोघी' अडकल्या प्रेम बंधनात

HistoryhappenedinNepal

नेपाळमध्ये घडला इतिहास

काठमांडू: भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये लेस्बियन जोडप्याच्या अधिकृत विवाहाची पहिलीच घटना समोर आली आहे. या जोडप्याने त्यांच्या लग्नाची अधिकृत नोंदणीही केली आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजू देवी श्रेष्ठ उर्फ दीप्ती आणि सुप्रीता गुरुंग या नेपाळमध्ये अधिकृतपणे लग्नाची नोंदणी करणारे पहिले 'लेस्बियन' जोडपे ठरले आहे. त्यांच्या विवाहामुळे नेपाळमध्ये इतिहास रचला आहे.

लेस्बियन पद्धतीने लग्न करणाऱ्या दोघींचे वय ३३ वर्षे आहे. पश्चिम नेपाळमधील बर्दिया जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या दीप्ती आणि स्यांगजा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सुप्रीता यांनी नुकतेच बर्दिया जिल्ह्यातील जमुना ग्रामीण नगरपालिकेत लग्नाची नोंदणी केली. समलैंगिक कार्यकर्ते आणि माजी खासदार सुनील बाबू पंत यांनी सांगितले की, प्रभाग सचिव दीपक नेपाळ यांनी त्यांना विवाह प्रमाणपत्र दिले. पंत यांनी दावा केला की, दक्षिण आशियामध्ये समलिंगी जोडप्याने त्यांच्या विवाहाची अधिकृत नोंदणी केल्याची ही पहिलीच घटना आहे. समलिंगी विवाहाची औपचारिक नोंदणी करणारा नेपाळ हा दक्षिण आशियातील पहिला देश आहे.

गेल्या वर्षी २९ नोव्हेंबर रोजी माया गुरुंग (३५ वर्षे) आणि सुरेंद्र पांडे (३७ वर्षे) यांनी लमजुंग जिल्ह्यातील पहिले 'गे' जोडपे म्हणून अधिकृतपणे त्यांच्या लग्नाची नोंदणी केली. गुरुंग आणि पांडे दोघेही त्यांच्या जन्माच्या वेळी पुरुष होते. २००७ मध्ये, नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक विवाहास मान्यता दिली, ज्याचा २०१५ मध्ये घटनेत समावेश करण्यात आला. तथापि, गेल्या वर्षी २७ जून रोजी, सर्वोच्च न्यायालयाने नेपाळमध्ये समलैंगिक विवाह अधिकृतपणे कायदेशीर करण्यासाठी गुरुंगसह विविध व्यक्तींच्या नेतृत्वाखाली दाखल केलेल्या रिट याचिकेवर आधारित अंतरिम आदेश जारी केला होता.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest