फिरकीअस्त्र बुमरॅंगही होऊ शकते...
यावेळीही भारतीय संघ हीच रणनीती आखणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. कारण टाॅम हर्टले आणि रेहान अहमद हे नवोदित फिरकीपटू तसेच जो रूटच्या कामचलाऊ फिरकीसमोर बलाढ्य म्हणवली जाणारी भारतीय फलंदाजी ढेपाळली. हर्टले तर अश्विन-जडेजा या भारतीय फिरकीपटूंना मागे टाकून बुमराहनंतर सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने दोन सामन्यांत १४ बळी टिपले आहेत. रेहाननेही दोन सामन्यांत ८ गडी बाद केले आहेत. जो रूट महत्त्वाच्या क्षणी बळी मिळवत आहे. हे पाहता तिसरी कसोटी जिंकण्यासाठी भारतीय संघव्यवस्थापन आपले बलस्थान असलेल्या फिरकी गोलंदाजीला केंद्रस्थानी ठेवून रणनीती आखत असले तरी ही योजना त्यांच्यावर उलटूदेखील शकते. असे झाल्यास भारतीय संघासमोर ‘प्लान बी’ काय असेल, याबाबत उत्सुकता आहे.