‘तुतारीवाले म्हणतात चिन्हाच्या यादीतून आता साम्य असणारी पिपाणी वगळा’

लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तुतारी वाजवणारा माणूस या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली होती

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Tue, 25 Jun 2024
  • 05:47 pm
tutari

संग्रहित छायाचित्र

मुंबई: लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तुतारी वाजवणारा माणूस या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवली होती. याचवेळी राज्यात निवडणूक आयोगाने चिन्हाशी साम्य असलेले पिपाणी हे चिन्हदेखील अनेक अपक्ष उमेदवारांना दिलेले होते. चिन्हांतील गोंधळामुळे ‘पिपाणी’ला राज्यात लाखो मते मिळाली असून त्याचा फटक शरद पवार गटाच्या उमेदवारांना बसला होता. 

सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे  यांचा पराभव तर पिपाणी चिन्हामुळे झाल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता. पिपाणी या चिन्हाला निवडणूक चिन्हांच्या यादीत ‘तुतारी’ असं नाव आहे. चिन्हांमध्ये साम्य आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मिळणारी मतं अपक्ष उमेदवारांना मिळाली, असा दावा राष्ट्रवादीचा आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest