ईव्हीएमवर आरोप करणे हा रडीचा डाव; आमदार श्रीकांत भारतीय यांचा टोला, मोहिते पाटलांवर कारवाई होणारच

निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता ईव्हीएमवर आरोप करणे हा रडीचा डाव आहे. राज्यात मिळालेले यश हे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या सामूहिक नेतृत्वाचे असून पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडायची पद्धत रूढ झाली असल्याचे प्रतिपादन श्रीकांत भारतीय यांनी पंढरपुरात केले आहे.

EVM,Eknath Shinde, Devendra Fadnavis ,Ajit Pawar,Election,Civic mirror

संग्रहित छायाचित्र

सोलापूर : निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता ईव्हीएमवर आरोप करणे हा रडीचा डाव आहे. राज्यात मिळालेले यश हे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या सामूहिक नेतृत्वाचे असून पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडायची पद्धत रूढ झाली असल्याचे प्रतिपादन श्रीकांत भारतीय यांनी पंढरपुरात  केले आहे.

महायुतीच्या विजयानंतर श्रीकांत भारतीय यांनी गेल्या शुक्रवारी (दि. २९)  विठ्ठल मंदिरात येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर टीका केली. यावेळी भारतीय म्हणाले, रोज सकाळी वाजणाऱ्या भोंग्याचे सेल आता संपले. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी ईव्हीएमवर आरोप केले असते तर समजू शकलो असतो. मात्र, राज्यातील ९ कोटी जनतेने विरोधकांना चांगला धडा शिकवला आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याबाबत भाजप जिल्हाध्यक्ष व माळशिरसचे उमेदवार राम सातपुते यांनीही तक्रार केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावर गंभीरपणे कारवाई करतील, असे स्पष्ट मत आ. श्रीकांत भारतीय यांनी मांडले. जे जे चुकीचे वागले आहेत, त्या सर्वांना त्यांची जागा दाखवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

ज्येष्ठ आणि शीर्षस्थ नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते शरद पवार देखील यात सामील झाले हे दुर्दैव आहे. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता ईव्हीएमवर आरोप करणे हा रडीचा डाव आहे. राज्यात मिळालेले यश हे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या सामूहिक नेतृत्वाचे असून, राज्यात आता भाजपचे सरकार येत असून, मुख्यमंत्रीही भाजपचा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  एकीकडे रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाईची मागणी होत असताना दुसरीकडे रणजितसिंह मोहिते-पाटील मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. या भेटीमुळे वेगळी चर्चा सुरू झाली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest