पुणे: दोन दादांवरून मिटकरी-दरेकरांमध्ये जुंपली!

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे पुण्याचे विद्यमान पालकमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केल्यानंतर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर हे चंद्रकांत पाटील यांच्या मदतीला धावून आले.

L3 Drugs Party

संग्रहित छायाचित्र

चंद्रकांत पाटील यांची अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका, त्यावर अमोल मिटकरींनी संताप व्यक्त केल्यावर प्रवीण दरेकरही भिडले

पुण्यातील एफसी रोडवरील लिक्विड लेजर लॉजमध्ये (L3 Drugs Party) रविवारी (२३ जून) रात्री झालेल्या पार्टीत ड्रग्ज आणि अल्पवयीन मुलांना दारू पुरवण्यात आल्याचे व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. मात्र व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी अप्रत्यक्षपणे पुण्याचे विद्यमान पालकमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला होता. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी संताप व्यक्त केल्यानंतर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) हे चंद्रकांत पाटील यांच्या मदतीला धावून आले.

हॉटेलमधील ड्रग्जचे व्हीडीओ समोर आल्यानंतर दोन दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, ‘‘मी पालकमंत्री असताना कधी अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या नाहीत, ज्याबद्दल सर्वजण चिंता करतील.’’ अशा गोष्टी घडल्या आहेत का, असा सवाल करत खरं तर आठवतही नाही. तुम्हालाही आठवत नसेल, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधला. पण त्यांना आपली चूक लक्षात येताच बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. अशा घटना घडल्या नाहीत, असा दावा करता येत नाही ना? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला होता. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला.

अमोल मिटकरी यांनी ट्विट करताना म्हटले की, चंद्रकांत पाटील तुम्ही पुण्याचे पालकमंत्री असताना ड्रग्जसासारख्या चिंताजनक घटना घडल्या नाहीत, कारण तुमच्या आशीर्वादाने हे सर्व काही पुण्यात व्यवस्थित सुरू होते. अजित पवार हे पालकमंत्री झाल्यामुळे या सर्व चिंताजनक घटना आज उघड झाल्या आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील व्यथित झाले आहेत, असे म्हणत अमोल मिटकरी यांनी ड्रग्ज प्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले.

यानंतर भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी मिटकरींना तोंडाला आवर घालण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे पुणे ड्रग्ज प्रकरणावरून महायुतीमधील वातावरण तापले आहे. अमोल मिटकरींनी चंद्रकांत पाटील यांच्यावर गभीर आरोप केल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी म्हटले की, अमोल मिटकरी यांनी तोंडाला आवर घालण्याची गरज आहे, त्यांना काय अधिकार आहेत, हे त्यांच्या पक्षाने पाहावे. ते नेहमी बाष्कळ बडबड असतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यांना समज देण्याची गरज आहे, महायुतीत तडा जाईल, असे वक्तव्य त्यांनी करू नये. ते महायुतीला हानिकारक आहे, असे दरेकर यांनी म्हटले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेलादेखील चंद्रकात पाटील यांनी उत्तर दिले. रोहित पवार यांनी ट्वीट करत चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तरही दिले आहे.

‘‘पुण्याचे पालकमंत्रिपदावरून भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्यात रस्सीखेच सुरू होती. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद होते. पण राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचा एक मोठा गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांनी या पदावर दावा ठोकला. त्यानुसार त्यांना पालकमंत्रिपद देण्यात आले. पण चंद्रकांत पाटील यांच्या मनातील ही सल बहुधा गेली नाही. त्यामुळेच पुण्यातील ड्रग्जप्रकरणावरून त्यांनी अजित पवार यांच्यावर शरसंधान केले,’’ अशी टिप्पणी रोहित पवार यांनी केली.

या संदर्भात ट्वीट करत, चंद्रकांत पाटील यांच्यासह उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोहित पवार यांनी टीका केली आहे. 'मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्याच नाही,' असे सांगणारे चंद्रकांत पाटील यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, तुम्ही पालकमंत्री असताना जानेवारी ते मे २०२३ या अवघ्या पाच महिन्यांत राज्यात तब्बल ७ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले आणि विशेष म्हणजे त्यात देशात कुठेही उपलब्ध न होणाऱ्या कॅथा इडूलीस या ड्रग्जचाही समावेश होता. आपल्या पालकमंत्रिपदाच्या काळात अमली पदार्थांच्या व्यापाराची पुण्यात जी पेरणी झाली त्याचेच पीक आज बहरत असून सांस्कृतिक पुणे हे पूर्णपणे 'उडते पुणे' झाले आहे, असे रोहित पवार यांनी सुनावले आहे.

भाजपचे नेते दरेकर म्हणाले, सकाळ, दुपार, संध्याकाळ देवेंद्र फडणवीसांवर टीका केल्याशिवाय रोहित पवार यांचा दिवस जात नाही. फडणवीसांच्या नेतृत्वाचा दरारा आहे, त्यांच्या भीतीपोटीच त्यांना टार्गेट केले जात आहे.

मिटकरींना दरेकरांचे प्रत्युत्तर

अमोल मिटकरी यांच्या आरोपावर भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘‘अमोल मिटकरी यांनी तोंडाला आवर घालण्याची गरज आहे. पक्षाने त्यांना काय अधिकार दिले आहेत? अमोल मिटकरी बाष्कळ बडबड करतात. त्यांना समज देण्याची गरज आहे. महायुतीला तडा जाईल, असे वक्तव्य त्यांनी करू नये. आपण एखादी गोष्ट बोलून जाता आणि ती महायुतीसाठी हानिकारक ठरते.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest