पुण्यात ठाकरे गट आक्रमक
भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्या व्हिडिओवरून विरोधकांची भाजपवर तुफान टीका सुरू आहे. किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर पुण्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महिला आक्रमक झाल्या आहेत.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला शेन लावून जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी आक्रमक शिवसैनिकांच्या वतीने भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.
ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या शहर संघटिका आणि माजी नगरसेविका पल्लवी जावळे म्हणाल्या की, “ज्या पद्धतीने किरीट सोमय्या यांचे जे व्हिडियो समोर आले आहे. ते लाजिरवाणी गोष्ट आहे. महाराष्ट्रातून भ्रष्टाचार बाहेर काढत असताना स्वतः हा किती घाणेरडे वृत्तीचे आहे. हे आत्ता सर्व सामान्य जनतेला कळले आहे.”
“आत्ता भाजपच्या महिला आघाडी तसेच त्यांच्या महिला नेत्या चित्रा वाघ कुठे आहे? चित्रा वाघ यांच्याकडे अनेक गोष्टी असतात सांगायला पण आता त्या का बोलत नाही? खरच गृहखात यावर कारवाई करणार का? कारण उलट आता यात किरीट सोमय्या सरकारकडूनच जास्त सिक्युरिटी मागणार आहे. आमची मागणी आहे की सरकारने याची दखल घेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी”, असेही यावेळी पल्लवी जावळे म्हणाल्या आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.