Ganeshotsav 2024: काश्मीरच्या लाल चौकात बाप्पा विराजमान

सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. पुण्याचा बाप्पा जम्मू-काश्मीरला पोहोचला असून, काश्मीरच्या श्रीनगरमधील लाल चौकातील पंच हनुमान मंदिरात सर्वधर्म समभाव गणपती बाप्पाच्या मूर्तीची कायमस्वरूपी प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sun, 8 Sep 2024
  • 01:30 pm
PuneMirror

संग्रहित छायाचित्र

सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. पुण्याचा बाप्पा जम्मू-काश्मीरला पोहोचला असून, काश्मीरच्या श्रीनगरमधील लाल चौकातील पंच हनुमान मंदिरात सर्वधर्म समभाव गणपती बाप्पाच्या मूर्तीची कायमस्वरूपी प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सीमेवर संरक्षण करणारे जवान, काश्मीरमधील मराठी बांधवांच्या हस्ते हा प्राणप्रतिष्ठापना सोहळा शुक्रवारी (दि. ६) पार पडला.

पुण्यातील वंदे मातरम् संघटना, सरहद संस्था व युवा फिनिक्स सोसायटी ट्रस्ट यांच्या सहकार्याने गणपती बाप्पांची ही मूर्ती कायमस्वरूपी येथे बसविण्यात आली आहे. या प्रसंगी आयटी सेल प्रमुख विशाल शिंदे, सीमेवरील जवान धनाजी हासबे, अनुप सावंत, चंद्रकांत जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व मराठी बांधव उपस्थित होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest