'कन्नी` मधील `यारा रे' गाणे सांगणार मैत्रीचा अर्थ

काही दिवसांपूर्वीच 'कन्नी' या चित्रपटाचा ट्रेलर दणक्यात पार पडला. प्रेक्षकांची ट्रेलरला पसंती देखील मिळाली.

PuneMirror

'कन्नी` मधील `यारा रे' गाणे सांगणार मैत्रीचा अर्थ

 ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच या चित्रपटातील 'यारा रे' हे अफलातून गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात एक वेगळाच उत्साह आहे. एनर्जीने भरलेले हे गाणे प्रत्येकाला मित्रांची आठवण करून देणारे आहे. ऋता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्या मैत्रीवरआधारित असलेल्या या गाण्याला जयदीप वैद्य यांचा जबरदस्त आवाज लाभला आहे. तर चैतन्य कुलकर्णी यांनी हे गाणे शब्दबद्ध केले असून एग्नेल रोमन यांनी अप्रतिम संगीत गाण्याला दिले आहे. 

मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांचे असून अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी 'कन्नी'चे निर्माते आहेत. या चित्रपटात ऋता दुर्गुळे, अजिंक्य राऊत, शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  येत्या ८ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

या गाण्याबद्दल दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, " 'यारा रे' या गाण्यात एक वेगळाच जोश आहे. हे गाणे रेकॉर्डिंग करताना आमच्यातही एक वेगळाच उत्साह  होता. हे गाणे ऐकताना कुठेतरी आपणही आपल्या मैत्रीच्या दिवसांमध्ये रमतो. 'यारा रे' गाण्याच्या प्रत्येक शब्दामध्ये मैत्रीची व्याख्या दडलेली आहे. त्यामुळे हे गाणे तरुणाईला विशेष जवळचे वाटेल.''

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story