‘हंटर’ अजूनही चर्चेत

मराठी आणि आता हिंदी सिनेसृष्टीतही आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. तिच्या सौंदर्याचे आणि अभिनय कौशल्याचे अनेक चाहते आहेत. मात्र तिच्या काही भूमिका वादग्रस्त ठरल्या आहेत.

Hunter,Sai Tamhankar, Actress, Marathi

File Photo

मराठी आणि आता हिंदी सिनेसृष्टीतही आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. तिच्या सौंदर्याचे आणि अभिनय कौशल्याचे अनेक चाहते आहेत. मात्र तिच्या काही भूमिका वादग्रस्त ठरल्या आहेत. यातील एक 'हंटर' हा चित्रपट होता, ज्यात तिने बोल्ड सीन दिले होते. या भूमिकेमुळे तिला काही चाहत्यांच्या टीकेलाही सामोरं जावं लागलं.

हंटर'मध्ये सईने एका विवाहित महिलेची भूमिका साकारली होती, ज्याचं अफेअर तिच्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीसोबत दाखवलं होतं. त्यातील इंटिमेट सीन चर्चेचा विषय होते. या चित्रपटात सईसोबत गुलशन, राधिका, सागर देशमुख, वीरा सक्सेना, रेचल डिसूझा, वैभव तत्ववादी, नीना कुलकर्णी आणि रवींद्र मंकणी यांसारखे कलाकार होते.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सईने या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तिने सांगितलं की, आधी ज्यांनी चित्रपटाला नावं ठेवली होती. त्यांनाच आता याबद्दल काहीच वाटत नाही.  हंटर हा चित्रपट काळाच्या पुढचा होता. त्या चित्रपटातील भूमिका माझ्या मित्रमंडळी आणि कुटुंबासाठी पचवायला थोडी अवघड होती. आता काही वर्षांनी त्यांना त्याबद्दल काहीच वाटत नाही.

सईने एक किस्सा सांगितला. एकदा हिमाचल प्रदेशात दोन पंजाबी मुलांनी तिला ओळखलं. त्यांनी तिला ती हंटर मधील अभिनेत्री आहे का हे विचारलं. हे ऐकून तिला तिला आश्चर्याचा धक्का बसला. सई म्हणाली,  हंटरमधल्या फोटोंवर आजही खूप कमेंट्स येतात. काही कमेंट्स खूपच मजेशीर असतात, काही मला फार आवडतात. काही मी रिपोस्ट सुद्धा करते. अलीकडेच सई ‘मानवत मर्डर्स’ या सिरिजमध्ये दिसली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story