File Photo
बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतच्या आजीचे निधन झाले. त्यांचे वय १०० वर्षांपेक्षा जास्त होते. इंद्राणी ठाकूर असे त्यांचे नाव होते. खोली साफ करताना त्यांना ब्रेन स्ट्रोक आला. त्यानंतर त्या काही काळ आजारी होत्या.आपल्या आजीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना कंगना रणौत आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या, काल रात्री माझी आजी इंद्राणी ठाकूर यांचे निधन झाले. संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. कृपया त्यांच्यासाथी प्रार्थना करा.
कंगणाने पुढे लिहिले की, माझी आजी एक अद्भुत स्त्री होती. त्यांना ५ अपत्ये होती. अगदी मर्यादित सांसाधने होती. तरीही त्यांनी सर्व मुलांना चांगल्या संस्थेत शिक्षण मिळवून दिले. इतकेच नाही तर मुलींनी काम करण्याबाबत, स्वत:ची करियर घडवण्याबाबत त्यांनी आग्रह धरला. त्या काळी तिच्या मुलीला सरकारी नोकरी मिळाली.
एका फोटो सोबत कंगणाने आजीचे कौतुक केले. आजीचे वय १०० वर्षे असूनही त्या स्वत:ची कामे स्वत: करत. पहाडी स्त्रीच्या विपरीत आजीची ऊंची ५ फुट ८ इंच होती. मला तिच्याकडून ऊंची मिळाली. आजी खूप निरोगी होती.
शेवटच्या फोटोसोबत कंगणाने म्हटले, काही दिवसांपूर्वी आजी स्वत:ची रूम साफ करत होती. त्यावेळी तिला ब्रेन स्ट्रोक आला. त्यानंतर काळ पडून होती. आजी खूप वेदनेत होती. तिने एक सुंदर जीवन जगले. ती नेहमी आमच्या डीएनएमध्ये असणार आहे. ती नेहमी आमच्या स्मरणात राहणार आहे.