ब्रेकअप, एकटेपणा अन् डिप्रेशन

गेल्या महिन्यात अर्जुन कपूरने मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपची अधिकृत घोषणा केली होती. मलायकासोबतचे नाते संपुष्टात आल्यानंतर अर्जुन सिंगल आहे. ‘सिंघम अगेन’ हा त्याच्या कारकिर्दीतील २० वा चित्रपट आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

गेल्या महिन्यात अर्जुन कपूरने मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपची अधिकृत घोषणा केली होती. मलायकासोबतचे नाते संपुष्टात आल्यानंतर अर्जुन सिंगल आहे. ‘सिंघम अगेन’ हा त्याच्या कारकिर्दीतील २० वा चित्रपट आहे. अलीकडेच, त्याने एका मुलाखतीत ब्रेकअप, एकटेपणा, नैराश्य, अपयश आणि इतर गोष्टींबद्दल मोकळेपणाने गप्पा मारल्या.

सध्या अर्जुन 'सिंघम अगेन'च्या यशाचा आनंद घेत आहे. मात्र, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तो डिप्रेशनशी झुंजत होता.  अर्जुनला विचारण्यात आले की, ब्रेकअप आणि डिप्रेशन या दोन्हींशी झुंजत असताना त्याने ‘सिंघम अगेन’मधील त्याच्या भूमिकेवर कसे लक्ष केंद्रित केले? या प्रश्नाच्या उत्तरात तो म्हणाला, ‘‘ब्रेकअपनंतर एकटेपणा आणि नैराश्य दूर करण्यासाठी मी थेरपी घेतली. काही काळाने असे दिसून आले की मी ऑटोइम्यून डिसऑर्डर हाशिमोटो यामुळे ग्रस्त आहे. हाशिमोटो रोग हा थायरॉईडचा विस्तार आहे, हा रोग थायरॉईड ग्रंथीवर परिणाम करतो. त्यामुळे थकवा येणे, वजन वाढणे अशी लक्षणे दिसतात. पण या कठीण परिस्थितीतून मी स्वत:ला सावण्यात यशस्वी ठरलो.’’

या मुलाखतीत अर्जुन म्हणाला, ‘‘मला वाटते की स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. स्वार्थी असण्याकडे वाईट नजरेने पाहिले जाते, पण स्वार्थी असण्यात काहीच गैर नाही. त्या वेळी माझ्या आयुष्यात काहीही चांगले सुरू नव्हते. नात्यात आणि आयुष्यात समस्या येत होत्या. अर्थातच याचा त्रास झाला. मात्र स्वत:वर मी जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केले आणि यातून बाहेर पडलो.’’

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा २०१९ पासून एकमेकांना डेट करत होते. काही काळानंतर या जोडप्याने त्यांचे नाते अधिकृत केले. ते अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत होते. हे जोडपे बरेच दिवस एकत्र फोटो शेअर करत नव्हते, त्यानंतर ब्रेकअपच्या अफवा पसरल्या होत्या. तथापि, गेल्या महिन्यात अभिनेत्याने या अफवांना पुष्टी दिली.

या मुलाखतीत अर्जुनने अनेक गोष्टींना उजाळा दिला. त्या सांगितले की, २०१२ मध्ये आई मोनाचे निधन झाले होते आणि त्यावेळी त्याची बहीण अंशुला दिल्लीत राहत होती. त्यामुळे अर्जुन कपूर मुंबईत एकटा पडला होता. अर्जुनने २०१२ मध्ये परिणती चोप्रासोबत ‘इशकजादे’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर त्यांनी ‘टू स्टेट्स’ आणि ‘गुंडे’मध्ये काम केले. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. इतकं यश मिळूनही जेव्हा-जेव्हा तो घरी परतायचा तेव्हा त्याला एकटं वाटायचं.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story