बाॅलिवूड स्टार कार्तिक आर्यनने अलीकडेच त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल सांगितले. डेटिंगच्या अफवांना उत्तर देताना कार्तिकने सांगितले की, तो सिंगल असून या स्टेटसचा आनंद घेत आहे.
कार्तिक म्हणाला, ‘‘गेल्या दोन वर्षांपासून मी ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटाची तयारी करत होतो. त्यासाठी क्रीडापटूसारखी जीवनशैली जगली. मी एका कठोर धावपटूची जीवनशैली स्वीकारली. यामुळे मला माझ्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष द्यायलाही वेळ मिळाला नाही. या क्षणी मी कोणत्याही नातेसंबंधात नाही किंवा कोणत्याही डेटिंग ॲप्ससाठी वेळ नाही. सध्या मी सिंगल लाइफचा आनंद घेत आहे. मला कोणालाही माझे लाइव्ह लोकेशन कोणालाही पाठवण्याची गरज नाही.’’
मी अतिशय कठोर दिनचर्यामध्ये होतो, एखाद्या खेळाडूप्रमाणेच मला जिम, जेवण आणि झोपेचे वेळापत्रक करावे लागले, हे सर्व दोन वर्षे चालले. याशिवाय मी पोहणेही शिकत होतो. माझा दिनक्रम इतका व्यस्त होता की मला इतर कशासाठीही वेळ नव्हता. ‘भूलभुलैया ३’चे शूटिंग करणेदेखील एक आव्हान होते, कारण ते वेळेवर पूर्ण करणे आवश्यक होते, असेदेखील कार्तिकने सांगितले.
कार्तिक आर्यनचा ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट १४ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट देशातील पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे. ‘भूलभुलैया ३’ हा चित्रपट १ नोव्हेंबरला रिलीज झाला. या चित्रपटात कार्तिकशिवाय विद्या बालन, तृप्ती डिमरी आणि माधुरी दीक्षित यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. एका आठवड्यात या चित्रपटाने दीडशे कोटींहून अधिक कमाई केली आहे.