नातं वाचवण्यासाठी ‘मणि’स्पर्श

गेल्या अनेक महिन्यांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. दरम्यान, आता दोघेही लवकरच एका चित्रपटात एकत्र दिसणार असल्याची बातमी आहे. मणिरत्नम या दोघांना घेऊन चित्रपट बनवण्याच्या विचारात आहेत.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

गेल्या अनेक महिन्यांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. दरम्यान, आता दोघेही लवकरच एका चित्रपटात एकत्र दिसणार असल्याची बातमी आहे. मणिरत्नम या दोघांना घेऊन चित्रपट बनवण्याच्या विचारात आहेत.

मणिरत्नम सध्या ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत तिसरा चित्रपट बनवण्यासाठी विषय शोधत आहेत. या दोघांना घेऊन चित्रपट बनवायचा असे त्यांनी ठरवले आहे, अशी माहिती चित्रपट निर्मितीच्या क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञांनी दिली.

याआधी मणिरत्नम यांच्या दोन चित्रपटांमध्ये ॲश-अभिषेक एकत्र दिसले होते. २००७ मध्ये रिलीज झालेल्या ‘गुरू’ या सुपरहिट चित्रपटात ऐश्वर्या आणि अभिषेक मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले होते. यानंतर २०१० मध्ये रिलीज झालेल्या 'रावण'मध्ये दोघेही एकत्र दिसले होते, मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नाही. ऐश्वर्या आणि अभिषेक यांना घेऊन मणिरत्नम चित्रपट तयार करणार असल्याचे हे वृत्त खरे ठरल्यास या दोघांना घेऊन केलेला त्यांचा हा तिसरा चित्रपट असेल. सध्या ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्यात तणाव असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे. हे नाते वाचवण्यासाठी दोघांच्या हितचिंतकांनी त्यांनी एकत्र करण्याचा पर्याय सुचवल्याचेही बोलले जात आहे.

अभिषेने मणिरत्नम यांच्या ‘युवा’ चित्रपटातही काम केले आहे. ऐश्वर्याने १९९७ मध्ये मणिरत्नम यांच्या तमिळ चित्रपट ‘इरुवर’मध्ये दुहेरी भूमिका साकारून तिच्या करिअरची सुरुवात केली. अलीकडेच ही अभिनेत्री त्यांच्या ‘पोन्नियन सेल्वन १’ आणि ‘पोन्नियन सेल्वन २’ या चित्रपटांमध्येही दिसली आहे.

ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी आतापर्यंत अर्धा डझन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. यात ‘ढाई अक्षर प्रेम के,’ ‘कुछ ना कहो,’ ‘उमराव जान,’ ‘गुरु,’ ‘सरकार राज,’ ‘रावण,’ ‘धूम २’ या चित्रपटांचा समावेश आहे.

अंबानी कुटुंबातील विवाह सोहळ्यापासून अभिषेक-ऐश्वर्याच्या कथित घटस्फोटाची चर्चा सुरू झाली. जुलैमध्ये मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीने राधिका मर्चंटसोबत लग्न केले. या लग्नात अभिषेक आपल्या कुटुंबासह पोहोचला होता, मात्र ऐश्वर्या त्यांच्यासोबत कुठेही दिसली नाही. बच्चन कुटुंबाने रेड कार्पेटवर कौटुंबिक फोटोंसाठी पोज दिली, तर त्यांच्या एन्ट्रीनंतर काही वेळातच ऐश्वर्या तिची मुलगी आराध्यासोबत लग्नात पोहोचली आणि एकटीने पोज दिली. यासोबतच लग्नाच्या संपूर्ण काळात दोघेही एकमेकांपासून दूर दिसले. काही काळानंतर ऐश्वर्या आपल्या मुलीसोबत सुट्टीवर गेली. यावेळीही अभिषेक तिच्यासोबत नव्हता. तेव्हापासून या जोडप्याच्या घटस्फोटाच्या बातम्या चर्चेत आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्या यांचे लग्न २००७ मध्ये झाले होते.  या जोडप्याला आराध्या ही मुलगी आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story