विक्रांत मॅस्सीला धमक्या

विक्रांत मॅस्सीचा ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या घोषणेपासून हा चित्रपट वादग्रस्त विषयामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे प्रमोशन जोरात सुरू आहे. दरम्यान, विक्रांत मॅस्सीला अनेक दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा खुलासा केला आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

विक्रांत मॅस्सीचा ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या घोषणेपासून हा चित्रपट वादग्रस्त विषयामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे प्रमोशन जोरात सुरू आहे. दरम्यान, विक्रांत मॅस्सीला अनेक दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा खुलासा केला आहे. अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार, त्याच्या आगामी चित्रपटासाठी या धमक्या दिल्या जात आहेत.

'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये विक्रांतला विचारण्यात आले की, त्याला धमक्या आल्या आहेत का? यावर तो म्हणाला, ‘‘मला आजपर्यंत कोणीही हे विचारले नाही, म्हणून मी याबद्दल सांगितले नाही. होय, मला धमक्या मिळाल्या आहेत आणि मिळत आहेत. पण मी म्हटल्याप्रमाणे, आम्ही कलाकार आहोत, आम्ही कथा विणतो. लोक काय विचार करतात किंवा त्यांना काय वाटते हे महत्त्वाचे नाही. मी या धोक्यांचा सामना करत आहे आणि आमची टीमदेखील एकत्रितपणे या धोक्यांना सामोरे जात आहे. मी सांगू इच्छितो की हा चित्रपटपूर्णपणे सत्यावर आधारित आहे. दुर्दैवाने, तुम्ही सर्वांनी हा चित्रपट अजून पाहिलेला नाही. म्हणून कोणताही पूर्वग्रह मनात करून घेऊ नये.’’

या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम बुधवारी (दि. ६) आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला हा चित्रपट ३ मे रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र लोकसभा निवडणुकीमुळे चित्रपट पुढे ढकलण्यात आला होता. आता हा चित्रपट १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. एकता कपूर निर्मित या चित्रपटात विक्रांत मॅसी, रिद्धी डोगरा आणि राशि खन्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये विक्रांत मॅसी, राशि खन्ना आणि रिद्धी डोगरा पत्रकारांच्या भूमिकेत दिसत आहेत. रंजन चंदेल दिग्दर्शित हा चित्रपट २००२ मधील गोध्रा घटनेवर आधारित आहे.

ट्रेलर लाँच झाल्यापासून ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट गुगलवर सतत सर्च केला जात आहे. गेल्या एक महिन्याच्या आकडेवारीवर नजर टाकली तरट्रेलर लॉन्च झाल्यानंतर ‘द साबरमती रिपोर्ट’ हा सर्वाधिक सर्च झालेला चित्रपट ठरला आहे.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story