उत्सुकता, आव्हान आणि बरेच काही!

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर कायम नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असते. अमृता आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही नवी भूमिका 'जज' ची असल्याचे कळत आहे. काही दिवसांपूर्वी अमृताचे अपहरण झाल्याचा व्हीडीओ समोर आला होता. अमृताने या आधी देखील अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका साकारली होती.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Tue, 11 Jun 2024
  • 05:11 pm

संग्रहित छायाचित्र

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amrita Khanwilkar)कायम नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असते. अमृता आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही नवी भूमिका 'जज' ची असल्याचे कळत आहे. काही दिवसांपूर्वी अमृताचे अपहरण झाल्याचा व्हीडीओ समोर आला होता. अमृताने या आधी देखील अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा ती या लहान मुलांसोबत दंगा करायला सज्ज आहे. अमृता ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रमाच्या परीक्षणाची धुरा सांभाळणार असून सोबतीला संकर्षण कऱ्हाडे देखील असणार आहे.

अमृता या बद्दल म्हणते 'खरंतर या शोसाठी मी खूप उत्सुक आहे आणि एवढ्या लहान कलाकारांना जज करणे माझ्यासाठी आव्हान आहे. आजवर अनेक शोसाठी परीक्षक झाले, पण हा कार्यक्रम खूप खास आहे. लहान मुलांसोबत दंगा करायला मज्जा येणार आहे आणि अजून गंमतजमत यात होणार आहे.  कायम ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून अमृता ओळखली जाते. तिच्या सोशल मीडिया पोस्ट कायम चर्चेत असतात आणि आता ती ड्रामा ज्युनिअर्समध्ये दिसणार असल्याने प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. मराठी सोबतीनं हिंदीतसुद्धा अमृतानं बहुआयामी भूमिका करून प्रेक्षकांना मोहित केले आहे. एखाद्या कार्यक्रमाचं परीक्षक होणं नक्कीच सोप्प नसतं, असे  देखील ती या निमित्ताने सांगत आहे.

अमृता खानविलकरने वर्षाची सुरुवात 'लुटेरे' सारख्या दमदार प्रोजेक्टने केली होती. त्यानंतर 'चाचा विधायक है हमारे 3' आणि नुकतच अमृताने '36 डे' ची देखील घोषणा केली आहे. अशा सगळ्या प्रोजेक्ट्सनंतर आता अमृता ड्रामा ज्युनिअर्स कार्यक्रमात परीक्षणाची भूमिका बजावणार आहे. हा शो झी मराठी वाहिनीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून अमृता यात देखील तिच्या अनोख्या भूमिकेो प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज होत आहे. शो बद्दलचे अनेक अपडेट ती तिच्या सोशल मीडियावरून देखील देत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story