अंकुश गेडाम दोन वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ चित्रपट २०२२ साली प्रदर्शित झाला होता. विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘झुंड’ चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. तसेच या चित्रपटातून बरेच नवोदित कलाकार पाहायला मिळाले. यापैकी एक म्हणजे अंकुश गेडाम.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 3 Sep 2024
  • 03:48 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ चित्रपट २०२२ साली प्रदर्शित झाला होता. विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘झुंड’ चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. तसेच या चित्रपटातून बरेच नवोदित कलाकार पाहायला मिळाले. यापैकी एक म्हणजे अंकुश गेडाम.

अंकुशला ‘झुंड’ चित्रपटासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटातील अंकुशच्या कामाचे कौतुक बॉलीवूड कलाकारांसह अनेकांनी केले होते. अशा या उत्कृष्ट अभिनेत्याला आता आणखी एक मोठी संधी मिळाली आहे. दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा अंकुश मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. बॉलीवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या चित्रपटात त्याची वर्णी लागली आहे. अभिनेता अंकुश गेडामला पोलीस व्हायचे होते. पण नागराज मुंजळेंनी त्याला ‘झुंड’ चित्रपटात घेतले आणि अंकुशचे नशीबच पालटले.

अत्यंत सामान्य घरातून आलेल्या अंकुशने आपल्या दमदार अभिनयाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘झुंड’ चित्रपटात अंकुशने साकारलेली डॉनची भूमिका चांगली भाव खाऊन गेली होती. आता पुन्हा एकदा अंकुश नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येणार आहे.बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटात अंकुश झळकणार असल्याचे समोर आले आहे. याबाबत अंकुशने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. अनुराग कश्यपबरोबरचा फोटो शेअर करत अंकुशने लिहिले आहे, इंडस्ट्रीत दोन वर्ष आणि दोन जबरदस्त दिग्दर्शकांबरोबर काम करणे हे स्वप्नाहूनही कमी नाही. अनुराग सर तुमच्याबरोबर काम करणे हे माझे स्वप्न होते. तुम्ही फक्त चांगले दिग्दर्शकच नाही तर खूप चांगले माणूस आहात. तुम्ही मला आपल्या घरातल्या सारखे वागवले. तुमच्याबरोबर काम करून मला खूप भारी वाटले.  प्रेक्षक लवकरच तुम्हाला मोठ्या पडद्यावर भेटण्यासाठी येत आहे. खूप सारे प्रेम.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story