संग्रहित छायाचित्र
झगमगत्या विश्वात अशा असंख्य अभिनेत्री आहेत, ज्यांनी अनेक संघर्षाचा सामना करत इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. इंडस्ट्रीमध्ये काम करत अभिनेत्रींनी फक्त प्रसिद्धी नाही तर, संपत्ती देखील मिळवली आहे. झगमगत्या विश्वातील काही अभिनेत्री आता कोट्यवधी रुपये कमावतात.
अभिनेत्रींची संपूर्ण संपत्ती जाणून तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आहे. अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर समंथा हिने झगमगत्या विश्वात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. समंथा एका सिनेमासाठी तगडे मानधन घेते. एका आयटम सॉंगसाठी समंथा ५ कोटी रुपये मानधन घेते. इतर अभिनेत्री आयटमसाठी जवळपास २ कोटी रुपये मानधन घेतात. पण समंथाने एका आयटमसाठी ५ कोटी रुपये मानधन घेतले होते. ‘पुष्पा’ सिनेमातील 'ओ अंटावा' गाण्यात दमदार डान्स करत तिने सर्वांना चकित केले होते.
पुष्पा सिनेमात अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत होती. पण रश्मिकापेक्षा अधिक मानधन समंथाने एका आयटम सॉंगसाठी घेतले होते.रश्मिकाने सिनेमासाठी २ कोटी रुपये मानधन घेतले होते. सिनेमाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले होते. आता सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. समंथाची संपत्ती १०१ कोटी रुपये आहे. एका सिनेमासाठी अभिनेत्री ५ कोटी रुपये मानधन घेते. शिवाय अभिनेत्री जाहिरातींसाठी ८ कोटी रुपये मानधन घेते. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अभिनेत्री बक्कळ पैसे कमावते.