संग्रहित छायाचित्र
बॉयफ्रेंड सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाला बराच काळ तुरुंगात राहावे लागले. जेव्हा ती तुरुंगात होती तेव्हा तिचे मित्र तिच्या आई-वडिलांसोबत रोज दारू प्यायचे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर जेव्हा तिला हा प्रकार कळला तेव्हा ती खूप संतापली. हा अनुभव खूप वेदनादायी होता, असे तिने एका मुलाखतीत सांगितले.
अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत रियाने तिच्या वाईट काळात मित्रांकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल सांगितले. ती म्हणाली, माझ्या वाईट काळात काही मित्रांनी खूप मदत केली. मी तुरुंगात असताना त्यांनी माझ्या आई-वडिलांची खूप काळजी घेतली. माझे मित्र, जे एक जोडपे होते, ते दररोज माझ्या घरी जायचे आणि माझ्या आईवडिलांसोबत जेवण करून दारू प्यायचे. जेव्हा मी तुरुंगातून बाहेर आले तेव्हा त्यांना पाहताच मी त्यांना विचारले की त्यांचे इतके वजन कसे वाढले? मी त्यांना म्हणाले, मी तुरुंगात होते आणि तुम्ही इथे खात-पीत होता आणि वजन वाढवत होता. तर ते उत्तर द्यायचे की आम्ही काका-काकूंना खाऊ-पिऊ घालायचो. जेणेकरून त्यांना नॉर्मल वाटेल.’’ तुरुंगात गेल्यानंतर आपले खरे मित्र कोण आहेत हे कळले, असेही तिने यावेळी सांगितले.
या मुलाखतीत रियाने तुरुंगातून बाहेर येण्याचा अनुभव शेअर केला. ‘‘तो खूप विचित्र दिवस होता. आम्ही आनंदी होतो, पण मन दु:खी होते. आम्ही पूर्वीसारखे राहिलो नव्हतो. आमच्या आत भीती होती. माझा भाऊ तुरुंगात गेला तेव्हा तो फक्त २४ वर्षांचा होता. त्याला ‘सीएटी’मध्ये ९६ टक्के गुण मिळाले होते. त्या जोरावर आयआयएममध्ये प्रवेश मिळाला. पण त्याच वर्षी तुरुंगात जावे लागले. हा त्याचा जीवनप्रवास होता. तीन महिने तुरुंगात काढल्यानंतर तो घरी आला. हे खूप वेगळे होते. पण तरीही आम्ही आशा ठेवण्याचे धाडस करतो. आम्हाला अजूनही विश्वास आहे की आम्ही एक दिवस सामान्य होऊ,’’ असे सांगताना तिचा स्वर कातर झाला होता.१४ जून २०२० रोजी सुशांत त्याच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यावेळी सुशांत आणि रिया रिलेशनशिपमध्ये होते. तिने मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी फ्लॅट सोडला होता. रियाचे नावही या प्रकरणात जोडले गेले. ड्रग्ज तस्करांशी संबंध आल्याने तिला बराच काळ तुरुंगात राहावे लागले होते.