संग्रहित छायाचित्र
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होत असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान ऐश्वर्या राय आता मुलगी आराध्यासोबत सासरच्या घरी पोहोचली आहे. दोघीही ‘जलसा’ या बच्चन कुटुंबीयांच्या निवासस्थानी एन्ट्री घेताना दिसल्या.
नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या ही मुलगी आराध्यासोबत ‘जलसा’मध्ये दिसली होती. यावेळी आराध्याने शाळेचा गणवेश परिधान केला होता. दोघीही गाडीतून खाली उतरल्या आणि लगेच घरात शिरल्या. या दोघींनीही पापाराझींसाठी पोज दिली नाहीत. व्हिडीओ पाहून ऐश्वर्या आणि आराध्या शाळेतून थेट घरी आल्याचे स्पष्ट झाले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जुलैमध्ये बिझनेस टायकून मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंतने राधिका मर्चंटसोबत लग्न केले. या लग्नात अभिषेक कुटुंबासह पोहोचला होता, मात्र ऐश्वर्यात्यांच्यासोबत कुठेही दिसली नाही. बच्चन कुटुंबाने रेड कार्पेटवर कौटुंबिक फोटोंसाठी पोज दिली. त्यांच्या एन्ट्रीनंतर काही वेळाने ऐश्वर्या मुलगी आराध्यासोबत लग्नात पोहोचली आणि एकटीने पोज दिली. एंट्रीशिवाय लग्नाच्या संपूर्ण काळात दोघेही एकमेकांपासून दूर दिसले. काही काळानंतर ऐश्वर्या राय आपल्या मुलीसोबत सुट्टीवर गेली, यावेळीही अभिषेक तिच्यासोबत नव्हता. तेव्हापासून या जोडप्याच्या घटस्फोटाच्या बातम्या चर्चेत आहेत.
घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, अभिषेक बच्चनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो ऐश्वर्यापासून घटस्फोटाची घोषणा करताना दिसत होता. तथापि, नंतर हे उघड झाले की अभिषेकचा व्हायरल व्हिडिओ डीपफेक होता. तो ‘एआय’च्या मदतीने तयार करण्यात आला होता.