'ब्रेक अप के बाद'
२०२२ साली ती ‘सेकंड शो’ या दाक्षिणात्य चित्रपटात शेवटची दिसली होती. सध्या पल्लवी जाहिरात क्षेत्रात काम करत आहे. पण लवकरच तिचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
पल्लवी जितकी तिच्या कामामुळे चर्चेत असायची तितकीच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत होती. एकेकाळी पल्लवीचे मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याबरोबरच अफेअर चांगलेच गाजले होते. ८ वर्षे दोघे एकमेकांना डेट करत होते. पण पल्लवीचे हे ८ वर्षांचे नात क्षणात मोडले. त्यानंतर यातून ती कशी सावरली? याविषयी अभिनेत्रीने नुकतेच सांगितले. पल्लवी म्हणाली, बराच काळ एखाद्याबरोबर असलेले नाते संपल्यानंतर त्यातून बाहेर पडायला वेळ लागतो. त्रासही होत होता. हे सगळे मी अनुभवले आहे. मात्र या वेळी मी ‘अशोका’ मालिकेसाठी काम करायला सुरुवात केली. यामुळे मी त्यात व्यग्र झाले. मालिकेकडे लक्ष दिल्यामुळे मन त्यात गुंतले होते. माझ्या आयुष्यात घडलेल्या या गोष्टींची कल्पना मालिकेच्या टीमलाही होती. त्यामुळे त्या सगळ्यांनी मला खूप सहकार्य केले. दरम्यान, पल्लवीने नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये काम केले आहे. मराठीसह हिंदी, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. भविष्यात चरित्रपटात काम करण्याची इच्छा पल्लवीने व्यक्त केली आहे.