अनोखी पंगत!
शक्ती तसेच सेवा आणि त्यागाचे प्रतीक मानल्या गेलेल्या हनुमानाची जयंती गुरुवारी (दि. ६) देशात सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. अकोला जिल्ह्यातील कोथळी खुर्द (ता. बार्शी टाकळी) या गावात हनुमान जयंतीनिमित्त अनोखी पंगत पार पडली. गावातील मुंगसाजी महाराज देवस्थानच्या वतीने माकडांना पंगतीत बसवून मिष्टान्न देण्यात आले. विशेष म्हणजे, या पाहुण्यांनी यजमानांच्या या आतिथ्याचा आदर राखत कोणताही गोंधळ न घालता अतिशय शिस्तपूर्ण पद्धतीने पंगतीवर ताव मारला! वृत्तसंस्था