सत्ता स्थापन करणाऱ्याला पाठिंबा : प्रकाश आंबेडकर

लोकसभा निवडणुकीच्या आधीच वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सामील होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. महाविकास आघाडीच्या बैठकीतदेखील आंबेडकर यांनी उपस्थित राहून जागा वाटपावर चर्चा केली होती.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सत्तास्थापनेबाबत मोठा दावा केला आहे. उद्या लागणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीला सत्ता स्थापन करण्यासाठी सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षाला किंवा युतीला पाठिंबा देण्याची वेळ आली तर आम्ही त्यांच्यासोबत जाणे पसंत करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर राज्यात कोणाचे सरकार स्थापन होईल, याबाबत सध्या चर्चा सुरू आहेत. त्यातच माध्यमांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार महायुती असो किंवा महाआघाडी सत्तेसाठी अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांची मदत घ्यावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी एका पोस्टच्या माध्यमातून आपण सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षासोबत राहणार असल्याचे म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधीच वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सामील होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. महाविकास आघाडीच्या बैठकीतदेखील आंबेडकर यांनी उपस्थित राहून जागा वाटपावर चर्चा केली होती. मात्र पुढील काळात ही चर्चा अर्धवट राहिली आणि वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र निवडणूक लढवली. मात्र वंचितला एकाही मतदारसंघात यश आले नाही. विधानसभा निवडणुकीत तरी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच यावेळीदेखील वंचितने स्वबळ आजमावले. त्यांना आपले काही उमेदवार निवडून येण्याची अपेक्षा आहे.  सत्ता स्थापनेसाठी गरज भासल्यास आपण पाठिंबा देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता वंचितच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest