आम्हीच होणार किंगमेकर

नागपूर:महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली आहे. बुधवारी (२० नोव्हेंबर) मतदान प्रक्रिया संपल्यावर एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आहेत. येत्या २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 22 Nov 2024
  • 12:46 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

आमच्याशिवाय सत्तास्थापन होऊ शकत नाही, एक्झिट पोल पाहून बच्चू कडू यांनी केला दावा

नागपूर:महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली आहे. बुधवारी (२० नोव्हेंबर) मतदान प्रक्रिया संपल्यावर एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आहेत. येत्या २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. आज जाहीर झालेल्या प्रमुख १० पैकी सहा एक्झिट पोल्सनी महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. तर तीन एक्झिट पोल महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी आमच्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही, असा दावा केला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या कडू यांचे हे विधान विशेष चर्चेत आहे.

आमदार बच्चू कडू म्हणाले, भाजपने आमच्या मतदारसंघात खूप ताकद लावली, अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला. परंतु, अखेरपर्यंत ते संभ्रमात होते. सुरुवातीला काँग्रेस भाजपाबरोबर होती, मग भाजपा काँग्रेसचे समर्थन करत होती. कारण दोन्ही पक्षांचे उद्दीष्ट एकच होते, ते उद्दीष्ट म्हणजे बच्चू कडूला पाडणे. ते दोघे एकमेकांशी लढताना बच्चू कडूला पाडण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून काम व प्रचार करत होते. त्या दोन्ही पक्षांचे उमेदवार स्वतः निवडून येण्यापेक्षा मला पाडण्याचाच विचार करत होते. जिंकण्यापेक्षा मला पाडणे ही त्यांची प्राथमिकता होती. मात्र, मला सर्वांना सांगायचे आहे की, आमचा विजय पक्का आहे. राज्यात आम्हीच सत्ता स्थापन करणार आहोत, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. बाकीच्यांना आम्हाला पाठिंबा द्यावा लागेल. एक्झिट पोलचे आकडे पाहता कोणाची सत्ता येईल हे सांगता येत नाही. मात्र आमच्याशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही, हे मी ठामपणे सांगू शकतो, असा दावा त्यांनी केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest