याला आम्ही ब्राह्मणांचा जिहाद म्हणायचे का?

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. २३ नोव्हेंबरला हा निकाल लागणार आहे. दरम्यान एक्झिट पोल्स समोर आले आहेत. एक्झिट पोल्सनंतर ट्री आरोप-प्रत्यारोपांची फैरी थांबतील, असे वाटत होते. मात्र आता कँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ब्राम्हण समाजाच्या मतदानावरून भाजपला टार्गेट करायला सुरुवात केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 22 Nov 2024
  • 12:32 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

ब्राम्हण मतदारांवरून नाना पटोलेंनी साधला भाजपवर निशाणा,एक्झिट पोलनंतरही काँग्रेसकडून आरोप सुरूच

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. २३ नोव्हेंबरला हा निकाल लागणार आहे. दरम्यान एक्झिट पोल्स समोर आले आहेत. एक्झिट पोल्सनंतर ट्री आरोप-प्रत्यारोपांची फैरी थांबतील, असे वाटत होते. मात्र आता कँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ब्राम्हण समाजाच्या मतदानावरून भाजपला टार्गेट करायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी जाहीर केले होते की, भाजपला मतदान करणार, त्याला काय आम्ही ब्राह्मणांचा जिहाद म्हणायचे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.  

तीन एक्झिट पोल्सनी महाविकास आघाडीचे सरकार येईल , असा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार येईल, असे सांगितले आहे.भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे पैसे वाटताना पकडले गेले. ते म्हणतात मी चिठ्ठी वाटायला गेलो होतो. ही बाब हास्यास्पद आहे. किती खोटे  बोलणार? देवेंद्र फडणवीस यांचे पीए असणारे वानखेडे हे आर्वीमधून उभे आहेत. त्यांच्या मतदारसंघात दारुबंदी असतानाही गोडाऊनमध्ये दारु सापडली. वर्धा दारुबंदीचा जिल्हा आहे. दारु आणि पैसा यांचे वाटप करुन हे नोट जिहाद करु इच्छितात का? भाजपकडून व्होट जिहादचा नारा दिला जातो. खरेतर मतदान करणे  हा प्रत्येकाचा अधिकार आहे. महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी जाहीर केले की भाजपला मतदान करणार, त्याला काय ब्राह्मणांचा जिहाद म्हणायचे का? काय चालले आहे हे महाराष्ट्रात? ज्यांना मतदान करायचे आहे त्यांचा तो अधिकार आहे, अशा शब्दांत नाना पटोले यांनी जुन्या वादाला नव्याने फोडणी दिली आहे.

भाजपने जे काही चालवले आहे ते नोट जिहाद आहे की दारु जिहाद आहे, असाही सवाल नाना पटोलेंनी विचारला आहे. एवढेच नाही तर महाविकास आघाडीचे सरकार अटीवर येईल हा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांचा एक व्हीडीओ व्हायरल झाला होता. विनोद तावडे हे कथितरित्या पैसे वाटप करत असल्याचा आरोप बविआचे हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी केला होता. मतदान पार पडण्याच्या आदल्या दिवशी ही घटना घडली होती. या घटनेचा संदर्भ देत नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे.महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल. मतदान झाल्यानंतर जे कौल समोर येत आहेत त्यानुसार काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून येतील आणि मुख्यमंत्री काँग्रेसचा होईल. महाविकास आघाडीचे सरकार काँग्रेसच्या नेतृत्वात येईल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असल्याचा दावाही नाना पटोले यांनी केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest