बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव; शरद पवार गटाच्या रमेश कदमांनी दाखल केली पोलिसांत तक्रार

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचे अपहरण करून खंडणी मागण्याचा प्रयत्न सुरू असल्याची क्लिप समोर आली आहे. या संदर्भात रमेश कदम यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचे अपहरण करून खंडणी मागण्याचा प्रयत्न सुरू असल्याची क्लिप समोर आली आहे. या संदर्भात रमेश कदम यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आपल्या जिवाला धोका असून बाबा सिद्दींकीप्रमाणे हत्या करण्याचा डाव असल्याचेही यावेळी बोलताना रमेश कदम म्हणाले आहेत.

आपल्या जीविताला धोका असून बाबा सिद्दीकींप्रमाणे हत्या करण्याचा डाव आहे, अशी तक्रार मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत दोघांना अटकही केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार रमेश कदम यांचे अपहरण करून खंडणी मागण्याचा प्रयत्न सुरू असल्याची ऑडिओ आणि व्हीडीओ क्लिप समोर आली आहे. मात्र, या ऑडिओ- व्हीडीओ क्लिपची पुष्टी करण्यात आलेली नाही. रमेश कदम यांना रिव्हॉल्वर लावून अपहरण करून पुण्यात नेण्याबाबत ऑडिओ आणि व्हीडीओ क्लिपमध्ये उल्लेख आहे. पुण्यातील आबा काशीद नामक व्यक्तीने सुपारी दिल्याचा फिर्यादीत उल्लेख आहे. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल झाला असून आकाश बाबर आणि धनराज भोसले हे आरोपी मोहोळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत, तर मुख्य आरोपी असलेल्या आबा काशीदचा शोध अद्याप सुरू आहे.

नेमके प्रकरण काय?
माझ्या जीविताला धोका, बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव आहे, असा उल्लेख मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यापैकी दोघांना अटक केली आहे. सध्या एक ऑडिओ आणि व्हीडीओ क्लिप समोर आली आहे. रमेश कदम यांना रिव्हॉल्वर लावून अपहरण करून पुण्यात नेण्याबाबत ऑडिओ आणि व्हीडीओ क्लिपमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. मोहोळ येथील आकाश बाबर आणि धनराज भोसले नामक युवकांना रमेश कदम यांचे अपहरण करण्यासाठी आबा काशीद याने सुपारी दिल्याचा आरोप केला आहे. मागील पंधरा दिवसात रमेश कदम यांनी जीविताला धोका असल्याबाबत दुसऱ्यांदा पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल झाला असून आकाश बाबर आणि धनराज भोसले हे आरोपी मोहोळ पोलिसांच्या ताब्यात आहेत. मात्र, मुख्य आरोपी असलेल्या आबासाहेब काशीद यांचा शोध सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. तिन्ही आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १४०(२), १४०(३),६२, ३ (५) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझ्या जीवितास धोका असून मागील पंधरा दिवसात हा दुसऱ्यांदा प्रकार घडला आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, मला पोलीस सुरक्षा मिळावी अन्यथा माझा बाबा सिद्दीकी व्हायला वेळ लागणार नाही,’ अशी प्रतिक्रिया माजी आमदार रमेश कदम यांनी दिली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest