शिवसेना हा पक्ष तुम्हीच फोडला

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर शिवसेना फोडल्याचा आरोप करणारे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांना छगन भुजबळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘‘शिवसेनेमध्ये भांडणे तुम्हीच लावली. तुम्हीच शिवसेना फोडली. अशी कामे शरद पवार करत नाहीत,’’ असे त्यांनी सुनावले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 9 Apr 2023
  • 02:32 am
शिवसेना हा पक्ष तुम्हीच फोडला

शिवसेना हा पक्ष तुम्हीच फोडला

शरद पवारांकडे बोट दाखवणाऱ्या चंद्रकांत पाटलांना भुजबळांचे प्रत्युत्तर

#नाशिक

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर  शिवसेना फोडल्याचा आरोप करणारे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांना छगन भुजबळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.  ‘‘शिवसेनेमध्ये भांडणे तुम्हीच लावली. तुम्हीच शिवसेना फोडली. अशी कामे शरद पवार करत नाहीत,’’ असे त्यांनी सुनावले.

शरद पवारांवर टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी असे वक्तव्य केले होते की, 'त्या' एका माणसामुळे दोन भावांमध्ये भांडण सुरू असून शिवसेनेच्या फुटीसाठीसुद्धा ते कारणीभूत आहेत. त्याला छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिले. ‘‘शिवसेनेत जी फूट पडली, त्यामागे कुणाचा हात आहे, हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. दोन भावांमध्ये आम्ही नाही तर तुम्ही भांडणे लावली. हेदेखील सर्व महाराष्ट्राला माहीत आहे,’’ असे भुजबळ म्हणाले.  

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी घोटाळ्याच्या चौकशीसाठी जेपीजीऐवजी सुप्रीम कोर्टाची समिती अधिक योग्य ठरेल, असे म्हटले आहे. तसेच, अदानींना लक्ष्य केल्याचे वाटते, अशी प्रतिक्रियाही त्यांनी एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत दिली. त्यावर भाष्य करताना छगन भुजबळ म्हणाले, ‘‘आपल्या देशातील उद्योगपतींचे खच्चीकरण करू नये. त्यांची तसेच आपली बदनामी होता कामा नये. अशीच भूमिका शरद पवारांनी मांडली आहे. एका उद्योगपतीचा मुद्दा किती ताणून धरायचा, याचाही विचार केला पाहिजे. संसदेचे पूर्ण अधिवेशन या एकाच मुद्द्यावर गेले. देशात बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांकडे लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे. या मुद्द्यांकडे लक्ष द्यायला हवे, असे शरद पवारांचे म्हणणे आहे.’’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्याला जात आहेत. यावर भुजबळ म्हणाले, ‘‘त्यांनी केवळ राजकारणासाठी अयोध्येला जाऊ नये. आम्ही  संतांकडून ऐकले आहे की, जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांना अयोध्येस जाण्यापासून कोण रोखणार?  जातच आहेत तर त्यांनी भक्तिभावाने जावे.’’

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest