सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, बिश्नोई गँगशी वैर संपवण्यासाठी केली 5 कोटींची मागणी

अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाळी आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर हा धमकीचा मेसेज आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Fri, 18 Oct 2024
  • 12:24 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाळी आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर हा धमकीचा मेसेज आला आहे. या मेसेजमध्ये  लॉरेन्स बिश्नोई गँग तसेच नुकतीच हत्या झालेले बाबा सिद्दिकी यांचा उल्लेख आहे. या मेसेजही सत्यासत्यता तपासून बघितली जात आहे. या धमकीत सलमान खान कडून 5 कोटींची मागणी करण्यात आली आहे. 

नुकतीच मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येचे जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे.  सलमान खान आणि बाबा सिद्दिकी यांची जवळीक होती. तसेच काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. 

लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खान याला अनेकदा धमक्या आलेल्या आहे. १९९८ साली सलमान खाननं दोन काळवीटांची शिकार केली होती. बिश्नोई समाजात काळवीटांना पवित्र मानले  जाते. काळवीटांच्या शिकारीमुळे बिश्नोई समाजात असंतोष पसरल्याचा दावा करत लॉरेन्स बिश्नोई गँगकडून अनेकदा सलमान खानला धमकी देण्यात आली आहे. 

मुंबई पोलिसांच्या व्हॉट्सअॅपवर आलेल्या धमकीत नेमकं काय आहे?
“हा मेसेज हलक्यात घेऊ नका. जर सलमान खानला जिवंत राहायचं असेल आणि लॉरेन्स बिश्नोई गँगशी असणारं वैर त्याला संपवायचं असेल, तर त्याला ५ कोटींची रक्कम द्यावी लागेल. जर पैसे मिळाले नाहीत, तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दिकीपेक्षा वाईट होईल.”

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest