पुणेकरांना हवी मिळकतकरात ४० टक्के सवलत

पुण्यातील मिळकतींचा शास्तीकर रद्द करून मिळकत करातील ४० टक्के सवलत पुन्हा लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने तातडीने घ्यावा, यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने बुधवारी (दि. ८) विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 9 Mar 2023
  • 04:02 pm
पुणेकरांना हवी मिळकतकरात ४० टक्के सवलत

पुणेकरांना हवी मिळकतकरात ४० टक्के सवलत

शास्तीकर रद्द करण्याचीही मागणी, विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

पुण्यातील मिळकतींचा शास्तीकर रद्द करून मिळकत करातील ४० टक्के सवलत पुन्हा लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने तातडीने घ्यावा, यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने बुधवारी (दि. ८) विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात लेखी निवेदन देण्यात आले. ज्याप्रमाणे राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड शहरातील शास्तीकर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानुसार पुण्यातील मिळकतींचा शास्तीकर रद्द करून मिळकत करातील ४० टक्के सवलत सरकारने पुन्हा लागू करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

‘‘पुणे शहरातील नागरिकांना पानशेत पूर दुर्घटनेपासून स्वतःच्या निवासी मिळकतीत ४० टक्के सवलत दिली जात होती. मात्र, महापालिकेने २०१८ पासूनच्या सवलतीपोटीची रक्कम वसूल करण्यासाठी आता नागरिकांना एसएमएसच्या माध्यमातून नोटीस बजाविण्यास सुरुवात केली आहे. आधीच बंद करण्यात आलेली सवलत आणि त्यावर थकीत रकमेचा बोजा यामुळे करदात्या पुणेकरांवर आर्थिक ताण आला आहे. परिणामी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याशिवाय पुणे महापालिकेकडून अनधिकृत निवासी मिळकतींना दीडपट तर व्यावसायिक मिळकतींना तीनपट इतका दंड (शास्ती) आकारला जात आहे. ही दंडाची ही रक्कम अवास्तव आहे,’’ असे निवेदनात नमूद केल्याची माहिती आमदार चेतन तुपे यांनी ‘सीविक मिरर’ला दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest