Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्या परळीतील कारखान्यावर छापा

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केली आहे. १२ कोटींचा जीएसटी चुकवल्याने ही कारवाई केल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे कारखान्याची मालमत्ता जप्त होण्याची शक्यता आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपाचं सरकार असतानाही पंकजा मुंडे यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 14 Apr 2023
  • 02:04 pm

पंकजा मुंडे यांच्या परळीतील कारखान्यावर छापा

#बीड

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केली आहे. १२ कोटींचा जीएसटी चुकवल्याने ही कारवाई केल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे कारखान्याची मालमत्ता जप्त होण्याची शक्यता आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपाचं सरकार असतानाही पंकजा मुंडे यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत. 

जीएसटी विभागाने कारखान्यात छापा टाकल्यानंतर काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणाबाबतची सविस्तर माहिती अद्याप पंकजा मुंडेंनाही देण्यात आलेली नाही. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, हा कारखाना गेल्या अनेक दिवसांपासून बंद असून त्याला कुलूप लावले आहे. कारखाना अत्यंत आर्थिक अडचणीत आहे. २०११ पासून कारखान्यात सतत कमी झालेले उत्पादन, २०१३-१५ मधील तीन वर्षातील दुष्काळ, उसाचा अभाव आणि कर्ज या कारणांमुळे कारखाना अडचणीत आहे.”

गोपीनाथ मुंडे यांनाही तेव्हा राजकारणामुळे कर्ज मिळालं नाही. त्यामुळे राष्ट्रीय बँकांकडून अधिक व्याजाने कर्ज घ्यावे लागले. या सगळ्या गोष्टींचा हा परिणाम आहे. ही सगळी तांत्रिक कारणे आहेत. सध्या कारखान्यात कोणीही काम करत नाही, त्यामुळे मी स्वत: कुलूप उघडून त्यांना कागदपत्रे दिली आहेत. हा तपास नेमका कसला आहे? हेही मला माहीत नाही. याबाबत मलाही हळूहळू कळेल, असेही  पंकजा मुंडे म्हणाल्या.

सकाळी १० वाजता जीएसटीचे अधिकारी पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात पोहोचले. त्यांनी कारखान्यातील आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी केली. पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील सुप्त कलह गेले अनेक वर्षे राज्यातील जनतेने पाहिला आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक येथे स्व. गोपीनाथराव मुंडे यांचा पुतळा अनावरण कार्यक्रमाला फडणवीसांना निमंत्रण नव्हतं. त्यामुळे वैद्यनाथ कारखान्यावर झालेल्या कारवाईविषयी तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest