Rashmi Thackeray : पक्ष सावरण्यासाठी आता रश्मी ठाकरे मैदानात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने शहरात अद्ययावत कार्यालयाच्या उभारणीसह ठाकरे गटातील अनेक महिला पदाधिकाऱ्यांना पक्षात घेण्याची मोहीम सुरू ठेवली आहे. त्याला तोंड देण्यासाठी आता ठाकरे गटाकडूनही महिला आघाडीला बळ देण्याच्या हालचाली होत आहेत. शिवसेनेची पडझड सावरण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे मैदानात उतरत आहेत. त्यासाठी नाशिकमध्ये रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत एप्रिलअखेरीस महिला मेळावा होणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 14 Apr 2023
  • 02:06 pm
पक्ष सावरण्यासाठी आता रश्मी ठाकरे मैदानात

पक्ष सावरण्यासाठी आता रश्मी ठाकरे मैदानात

नाशिकमध्ये महिनाअखेरीस महिला पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार

#नाशिक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने शहरात अद्ययावत कार्यालयाच्या उभारणीसह ठाकरे गटातील अनेक महिला पदाधिकाऱ्यांना पक्षात घेण्याची मोहीम सुरू ठेवली आहे. त्याला तोंड देण्यासाठी आता ठाकरे गटाकडूनही महिला आघाडीला बळ देण्याच्या  हालचाली होत आहेत. शिवसेनेची पडझड सावरण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे मैदानात उतरत आहेत. त्यासाठी नाशिकमध्ये रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत एप्रिलअखेरीस महिला मेळावा होणार आहे.

शहरासह जिल्ह्यात विस्तारासाठी शिवसेना जोराने कामाला लागली आहे. विशेषत्वाने ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. अलीकडेच ठाकरे गटाच्या अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची महिला आघाडी पुन्हा बळकट करण्यासाठी पदाधिकारी कामाला लागले आहेत. नाशिकरोड येथे शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीची बैठक काही दिवसांपूर्वी झाली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांनी लवकरच शहर कार्यकारिणीसह इतर पदाधिकारी निवडले जाणार असून त्यात जास्तीत जास्त महिलांना काम करण्याची संधी मिळेल, असे सांगितले होते. तसेच नाशिकमध्ये रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत महिला मेळावा होणार असल्याने त्यासाठी सर्व महिलांनी तयारीला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले होते. यावेळी जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनीही मार्गदर्शन केले होते.

या बैठकीनंतर पुन्हा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन एप्रिलअखेरीस रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या महिला मेळाव्याविषयी चर्चा करण्यात आली. अद्याप मेळाव्याची तारीख निश्चित नसली तरी रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये प्रथमच महिला मेळावा होणार असल्याने त्याची तयारी सुरू आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest